कुपोषण रोखण्यात राज्य शासन अपयशी, जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा घणाघाती आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 02:50 AM2018-07-31T02:50:54+5:302018-07-31T02:51:45+5:30

तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे एकट्या मोखाड्यात तब्बल ३२७ बालके कुपोषणाने पिडीत असून जून मध्ये दोन बालमृत्यू झाले आहेत.

 The state government fails to stop malnutrition, scandalous allegations of District Congress President | कुपोषण रोखण्यात राज्य शासन अपयशी, जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा घणाघाती आरोप

कुपोषण रोखण्यात राज्य शासन अपयशी, जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा घणाघाती आरोप

Next

मोखाडा : तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे एकट्या मोखाड्यात तब्बल ३२७ बालके कुपोषणाने पिडीत असून जून मध्ये दोन बालमृत्यू झाले आहेत ५३ बालके मृत्यूच्या दारात आहेत यामधील जून महिन्यात २ बालमृत्यू कुपोषणाने झाला नसल्याचा दावा प्रशासन करत आहे परंतु गेल्या २५ वर्षात कुपोषणाचा प्रश्न सुटलेला नसतांना सरकार आपली जबाबदारी झटकण्यात माहीर आहे हे काही नवीन नाही, अशी टीका पालघर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबतचे वृत्त लोकमतच्या २७ जूनच्या अंकात प्रसिद्ध होताच त्यांनी मोखाड्यातील कुपोषित भागाचा दौरा करून पहाणी केली यावेळी त्यानी बालमृत्यू झालेल्या पिंपळगाव व शिरसगाव येथे भेट देऊन आदिवासी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
शासनाच्या सर्व योजना फक्त जाहीराती पुरत्या व घोषणांसाठीच असाव्यात कारण मोखाडा तालुक्यात तीनशे पेक्षा जास्त बालके कुपोषणाने ग्रस्त आहेत. कुपोषण रोखण्यास शासन अपयशी असल्याचे ते म्हणाले शहरात अनेक समारंभात अन्न वाया जात असते आणि दुर्गम भागात काही बालकांना पुरेसे पोषक अन्न मिळत नाही योग्य व पुरेशी औषध मिळत नाहीत . हा विरोधाभास संपणार कधी असा सवाल त्यांनी केला.
त्यांच्या सोबत मधुकर चौधरी, बळवंत गावित, अशोक पाटील, लक्ष्मण मोंढे , गंगाराम वारखेडे सदाशिव झोले गणपत डबाली जमशेत फकीरा, दुर्वेस कंसारा, विशाल पागधरे, चंदर गोंडके व ग्रामिण भागातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बालमृत्यू झालेले परिवार हलाखीत
गरीबी व जगण्याचा संघर्ष येथे मोठ्या प्रमाणात आढळला बाळा लाखन ह्या तीन महीने बावीस दिवसाच्या मृत्यू झालेल्या बालकाच्या घरी त्यांनी भेट दिली असता मृत बालकाचे वडील मंगेश लाखन दु:ख बाजूला ठेवून कामावर गेले होते. आई शेतावर गेली होती. व तीन भावंडे,े आजोबा झिम्या लाखन व काका भाग्या लाखन हे सांभाळत होते. या गावाजवळच दोन तीन किलोमीटर वर वाशाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तरीही बालमृत्यू होत आहेत कुपोषण थांबण्याचे नाव घेत नाही. स्नेहा बांडे ह्या फक्त दोन महीने अकरा दिवसाच्या बालमृत्यू झालेल्या बालीकेच्या घरी गेले असता असे समजले की तिच्यावर जव्हार कुटीर रुग्णालयात १६ दिवस उपचार सुरू होते व नंतर सोडून देण्यात आले. ते पुढे म्हणाले जिल्ह्यातील कुपोषणा विरोधात कॉग्रेस पक्ष सतत आवाज उठवत राहील.
या विषयाची माहीती कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण विरोधी पक्ष नेते राधाकृष्णन पाटील व खासदार हुसेन दलवाई याना दिली असूूून ते या भागाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नावर आपला पक्ष सभागृहात आणि बाहेरही सातत्याने व प्रभावी आवाज उठवेल असे या वेळी त्यांनी स्पष्ट केले.

Web Title:  The state government fails to stop malnutrition, scandalous allegations of District Congress President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.