राज्यमार्गाचे काम अर्धवट

By Admin | Published: June 16, 2015 10:59 PM2015-06-16T22:59:22+5:302015-06-16T23:16:34+5:30

कर्जत-मुरबाड या राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण राज्य सरकारच्या अ‍ॅसेट निधीमधून पूर्ण करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम

State road work | राज्यमार्गाचे काम अर्धवट

राज्यमार्गाचे काम अर्धवट

googlenewsNext

कर्जत : कर्जत-मुरबाड या राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण राज्य सरकारच्या अ‍ॅसेट निधीमधून पूर्ण करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी सुरक्षा दगड आणले आहेत. ते दगड जमिनीमध्ये अर्धवट गाडून त्यांना पांढरा रंग लावण्याचे काम ठेकेदार कंपनीने अपूर्ण ठेवले आहे.
कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्याने जेएनपीटीकडे जाणारी आणि नाशिककडे जाणारी अवजड वाहने यांची वर्दळ असते. त्यामुळे कर्जत तालुक्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे या राज्यमार्ग रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी स्थानिक आमदार करीत होते. अखेर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्या रस्ते विकास म्हणजे अ‍ॅसेट निधीमधून या रस्त्याच्या रुंदीकरणास शासनाने परवानगी दिली होती.
कर्जत तालुका हद्दीतील ३५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले असून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात अद्याप रस्त्याचे काम सुरू झाले नाही. रस्त्याचे चौपदरीकरण झाले असते तर वाहनांसाठी एकमार्ग तयार झाला असता. पर्यायाने वाहतूक खोळंबा आणि अपघात यांचे प्रमाण देखील कमी झाले असते. परंतु तसे झाले नसले तरी रस्त्याचे रु ंदीकरण झाल्याने वाहनचालकांना चांगला रस्ता प्रवासासाठी मिळाला आहे. रस्त्याच्या कामामध्ये कर्जत तालुक्यात रुंदीकरण, डांबरीकरण ही मुख्य कामे झाल्यानंतर रस्त्यावर दुभाजक यांची रंगरंगोटी आणि रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात आलेल्या मातीच्या साईडपट्टीमध्ये सिमेंटचे ठोकळे असलेले दगड गाडून त्यांना पांढरा रंग लावण्याचे काम करणे बंधनकारक होते. मात्र ठेकेदार कंपनीने रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी आणलेले दगड आजही तसेच पडून आहेत.
कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारले असता दगड मातीमध्ये टाकण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती दिली. परंतु ते दगड मातीमध्ये कधी गाडणार, याचे उत्तर दिले नाही. त्या दगडांना लावलेल्या पांढऱ्या रंगामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालक यांच्यासाठी ही सूचना असते. त्यामुळे अवघड वळण आणि तीव्र उतार असलेल्या रस्त्यावर त्यांना त्याची मदत होत असते. परंतु राज्यमार्ग रस्त्यावर असे सुरक्षा दगड न लावल्यामुळे ठेकेदार कंपनीला तत्काळ सूचना देण्याची गरज आहे. पण ठेकेदार कंपनीचे लाड कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग करताना दिसत आहे. (वार्ताहर)

दगड रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी आणून टाकण्यात आले आहेत, परंतु ते लावण्याचे आदेश ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहेत.
- एस. एस. ढिलपे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम, कर्जत

Web Title: State road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.