सोपाराहून होणारे डाउन-अप थांबवा! वसईच्या संतप्त महिला प्रवाशांची रेल्वेकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 03:01 AM2018-12-27T03:01:22+5:302018-12-27T03:01:36+5:30
रोजचा प्रवास करणाऱ्या महिलांसाठी लोकलमध्ये बसण्यासाठी जागा मिळवणे हि तारे वरची कसरत असते.
विरार : रोजचा प्रवास करणाऱ्या महिलांसाठी लोकलमध्ये बसण्यासाठी जागा मिळवणे हि तारे वरची कसरत असते. सकाळच्या वेळेस कामाला जाणाºया महिला या जागा मिळवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत असतात, नालासोपाºयाहून विरार लोकलमध्ये बसून येणाºयांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे विरार महिला प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. याबद्दल अनेकदा तक्रार करून देखील अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही. आता कारवाई झाली नाही तर मोर्चा काढू असा इशारा महिलांकडून देण्यात आला आहे.
विरारहून चर्चगेटकडे जाणाºया महिलांना जागा मिळवणे अत्यंत गरजेचे असते. हा लांबचा प्रवास असल्याने उभे राहून जाणे शक्य होत नाही, त्यात नालासोपाºयाहून बसून येणाºयांची संख्या वाढत असल्याने विरार मधील महिला प्रवाशांना त्रास होत आहे. जागा मिळवण्यासाठी नालासोपारामधील महिलांकडून डाऊन-अप करण्याचा आटापिटा केला जातो. पण त्याचा परिणाम विरारहून बसणाºया महिला प्रवाशांवर होतो आहे. याबद्दल अनेकदा आर.पी.एफ कडे तक्र ार केली आहे. तरीही कोणीही याकडे लक्ष देत नसल्यामुळे महिला प्रवासी या विरोधात मोर्चा काढणार आहेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
विरार वसईमधून हजारो महिला कामाला निघतात प्रत्येकाला जागा मिळावी अशी आशा असते व जागा मिळविण्यासाठी जमेल तेवढे प्रयत्न महिलांकडून केले जातात. काही महिला तर अगदी धावून, उडी मारून सुद्धा ट्रेन पकडतात जे अतिशय धोकादायक आहे. यात सर्वात जास्त प्रयत्न केले जातात ते म्हणजे नालासोपाºयामधील महिलांकडून. सकाळच्या वेळेस ७ ते ९ च्या दरम्यान चर्चगेटहून येणारी कोणती लोकल परत जाताना ती विरार लोकल बनते याची माहिती काढून नालासोपाºयामधील महिला त्या लोकलमध्ये बसून येतात. त्यामुळे विरारच्या महिला प्रवाशांना जागा मिळत नाही. लोकल विरारला येतानाच भरून आलेली असते. त्यामुळे विरारमधील महिला प्रवाशांना उभे राहून जावे लागते.
पूर्वी ही संख्या फार कमी होती पण हि जागा मिळवण्याची सोपी पद्धत असल्यामुळे सगळ्या महिला हाच पर्याय निवडतात. त्यामुळे यात आता वाढत झाली आहे. अनेकदा विरारचे प्रवासी जागा मिळविण्यासाठी नालासोपाºयाला जाऊन मग डाऊन-अप करतात व यामध्ये त्यांचा अर्धा तास वाया जातो. नालासोपाराच नाही तर वसईहून देखील आता अनेक महिलांनी डाऊन करायला सुरुवात केली आहे. यार्डमधून येणारी लोकल रिकामी असल्याने बरेच लोक तिची वाट पाहतात. महिलांसाठी विशेष लोकल असून देखील महिला जनरल डब्यात बसून डाऊन-अप करतात. पुरुष प्रवाशाना देखील उभ्याने प्रवास करावा लागतो. मनसेने याबाबत आंदोलन केले होते तेही तात्कालीक ठरले.
...तर मनसे काढणार महिला प्रवाशांचा मोर्चा
पण त्यांचे प्रयत्न फक्त एकाच दिवसा पुरते होते. त्यानंतर समस्या होती तशी आहे. पण आता परत महिलांना लांबचा प्रवास उभ्याने करावा लागतो आहे.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्यांची मदत करावी अशी विनंती मनसेने केली आहे जर या विरोधात त्याने काही ठोस कारवाई केली नाही तर विरारच्या महिला प्रवासी मोर्चा काढतील, असा इशारा दिला आहे.