सुसज्ज रुग्णालयासाठी मनोरला रास्ता रोको, बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 03:16 AM2017-10-27T03:16:22+5:302017-10-27T03:16:24+5:30
मनोर : येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत तोंडाला पाने पुसणा-या व खोटी आश्वासन देणा-या आरोग्य अधिकारी, मंत्री व पालक मंत्र्यांच्या विरोधात आदिवासी मित्रमंडळ व ग्रामस्थांतर्फे पालघर रस्त्यावर गुरुवारी रस्ता रोको करण्यात आला.
अरिफ पटेल
मनोर : येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत तोंडाला पाने पुसणा-या व खोटी आश्वासन देणा-या आरोग्य अधिकारी, मंत्री व पालक मंत्र्यांच्या विरोधात आदिवासी मित्रमंडळ व ग्रामस्थांतर्फे पालघर रस्त्यावर गुरुवारी रस्ता रोको करण्यात आला. कडकडीत बंद पाळून उपोषण करण्यात आले. रिक्षा व बाजार पेठ बंद असल्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले.
मनोर ग्रामीण रुग्णालय मध्ये आरोग्य सुविधा नसल्याने स्वातंत्र्य दिनापासून तीन दिवस आदिवासी विकास मित्र मंडळ तर्फे संतोष जनाठे, अनंता पुंजारा, किसन भुयाल, सुनील किरकिरा व इतर सदस्य यांनी आमरण उपोषण केले होते त्यावेळी त्यांना राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांनी व ग्रामस्थांनी सहकार्य केले होते. तिसºया दिवशी पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सवरा, आरोग्य मंत्री डॉ. सावंत, तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपोषणच्या ठिकाणी येऊन मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले विष्णू सवरा यांच्या मध्यस्थीमुळे उपोषण मागे घेण्यात आले. मात्र दोन महिने उलटले तर ग्रामीण रुग्णालयांची परिस्थिती थी जैसे थे आहे. आजही वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूल तज्ज्ञ, पारिचिका, प्रयोग शाळा तज्ज्ञ, अशी अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे रुग्णांना मुंबई, ठाणे, सिल्व्हासा, वापी वलसाड येथे उपचारासाठी न्यावे लागते त्यामुळे गरीब रु ग्णांना उपचार अभावी मरण पत्करावे लागते आहे.