पालघर जिल्ह्यात सर्वत्र रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 03:02 AM2017-08-15T03:02:49+5:302017-08-15T03:02:52+5:30

Stop the pathways everywhere in the Palghar district | पालघर जिल्ह्यात सर्वत्र रास्ता रोको

पालघर जिल्ह्यात सर्वत्र रास्ता रोको

Next

पालघर : सर्वच शेतकºयांना सर्वंकश कर्जमाफी द्यावी आणि शेतकºयांच्या मूळावर उठलेले वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, डेडीकेटेड कॅरिडॉर व अन्य बडे प्रकल्प रद्द करावेत या मागणीसाठी सोमवारी पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. त्याला शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जव्हार सिल्व्हासा व नाशिक नाका आणि ठाणे भिवंडीकडे जाणाºया रस्त्यांवर सकाळी ७ वाजेपासून रस्ता रोको केला गेला.
तालुक्यातील माकपाचे शेकडो कार्यकर्ते रास्ता रोकोत सहभागी झाले होते. शेतकºयांची सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे, डॉ स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के असा हमी भाव देण्यात यावा, शेतकºयांचे संपूर्ण वीजबिल ेमाफ करा, ६० वर्षांवरील सर्व शेतकरी व शेतमजुरांना दरमहा पन्नास हजार पेन्शन देण्यात यावी, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
जि. प. सदस्य रतन बुधर, प.स. सदस्य यशवंत घाटाळ, लक्ष्मण जाधव, माकपाचे जिल्हा कमेटी सदस्य शिवराम बुधर, यशवंत बुधर, विजय शिंदे, शांतीबाई खूरकुटे, शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे या आंदोलनात स्वत:ला विरोधी पक्ष म्हणवून घेणारे राजकीय पक्ष फारसे कुठे दिसले नाहीत. हेच यांचे शेतकºयांबद्दलचे प्रेम समजावे काय? अशी चर्चा आंदोलनकर्त्यांमध्ये सुरू होती.
>तलासरीत चक्काजामला प्रतिसाद, जनतेचे झाले प्रचंड हाल, पोलीस वैतागले
तलासरी : पालघर जिल्हयात साकारणारे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे, वाढवण बंदर, सागरी महामार्ग, समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्ग, औद्योगिक कॉरीडोर, राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण, सूर्या प्रकल्पाचे पाणी पळविणे आदी प्रश्नांबाबत सूत्रकार फाटा येथे चक्काजाम करण्यात आले. माकपा, अखिल भारतीय किसान सभा, जनवादी महिला संघ व शेतकरी सुकाणू समिती व विविध संघटनांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग बंद पाडला. यामुळे चाकरमान्यांचे तसेच प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत. त्यात पावसाची भर पडली होती. महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या होत्या. एसटी आणि परिवहन सेवा तसेच खाजगी बससेवेचे वेळापत्रक यामुळे कोलमोडून गेले होते.
आंदोलनकर्त्यांनी संयम पाळल्याने व पोलिसांनीही सामंजस्याची भूमिका घेतल्याने हे आंदोलन जिल्ह्यात शांततेत पार पडले.असे असले तरी जनतेचे मात्र प्रचंड हाल झाले. ज्यांनी जोडून सुट्या घेऊन बाहेरगावी जाण्याचे ठरविले होते. त्यांचे व परिवहन आणि एसटी तसेच खाजगी बसेस यांचे वेळापत्रकही विस्कळीत झाले होते. दहीहंडीची सज्जता करणाºयांची देखील कोंडी झाली.मंगळवारी स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी अशा दुहेरी बंदोबस्ताच्या धामधूमीत आजच्या रास्ता रोकोच्या ताणाची भर पडल्याने पोलीसही वैतागले होते.
>तालुक्यातील कम्युनिस्ट पक्षाचा ५ तास रास्ता रोको
विक्रमगड : शेतकरी देशोधडीला लागला असून शेतकºयाच्या मालाला हमीभाव नाही त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये गेल्याने तो आत्महत्या करीत आहे. परंतु, या सरकारला जाग येत नाही कर्ज माफीची घोषणा केली परंतु ती बोगस असून शेतकºयांना या सरकारने फसवले आहे त्यामुळे सरकारने सरसकट कर्ज माफ करावे, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. आदी मागणीसाठी तालुक्यातील तलवाडा, मलवाडा, आलोंडा, उपराळे साखरे या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा, डी.वाय.एफ आय या संघटनांनी चक्काजाम केले. सकाळी ७ पासून या आंदोलनाला सुरूवात झाली दुपारी आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी पोलीस स्टेशनमध्ये हजर करून नंतर सोडून दिले. आंदोलन शांततेत पार पडले.

Web Title: Stop the pathways everywhere in the Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.