रस्ता दुरूस्तीसाठी रास्ता रोको
By admin | Published: August 30, 2016 02:23 AM2016-08-30T02:23:04+5:302016-08-30T02:23:04+5:30
येथील पूर्वेकडील चहाडे नाका ते दोन बंगला कुकडे या प्रचंड रहदारीच्या रस्त्याची भयावह दुरावस्था होऊनही सबंधित यंत्रणा करीत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करून तो त्वरीत दुरूस्त करावा
बोईसर : येथील पूर्वेकडील चहाडे नाका ते दोन बंगला कुकडे या प्रचंड रहदारीच्या रस्त्याची भयावह दुरावस्था होऊनही सबंधित यंत्रणा करीत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करून तो त्वरीत दुरूस्त करावा या मागणीकरिता भर पावसात दोन तास रास्ता रोको करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या मध्यस्थीनंतर तो मागे घेण्यात आला. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चहाडे नाका ते दोन बंगला कुकडे रस्ता संघर्ष समिती व ग्रामस्थांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामहामार्ग आणि बोईसर (तारापूर) एमआयडीसीला जोडणाऱ्या मुख्य व प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यांवर भर पावसात केलेल्या रास्ता रोको मध्ये रमेश डोंगरे, अविनाश पाटील, धीरज पाटील, योगेश पाटील, दिपेश पावडे, संतोष पावडे, महेंद्र धिकारी, राजू पाटील, भावेश पाटील, गीता काटकर, गौरी व भार्गवी पाटील, विपूल पाटील इ.सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित
होते.
विशेष बाब म्हणजे या ठिकाणी बहुसंख्य आदिवासी समाजाची लोकवस्ती असूनही आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आमदार, जिल्हा व पंचायत समितीचे सदस्य आदिवासी समाजाचे असतांनाही रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष का होत आहे असा सवाल आंदोलकांकडून करण्यात आला त्याचे कोणतेही उत्तर कोणाकडेही नव्हते.