जिल्हाबाह्य शिपाईभरती थांबवा, खरपडे व गंधे सीईओंना भेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 06:17 AM2018-01-06T06:17:45+5:302018-01-06T06:17:53+5:30
जिल्हा परिषदेत बेकायदेशीर व सरसकट बाह्य जिल्ह्यातील शिपाई यांची सुरू असलेली भरती तातडीने थांबवावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांच्यावतीने अध्यक्ष विजय खरपडे व उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांची भेट घेऊन केली.
- हितेन नाईक
पालघर - जिल्हा परिषदेत बेकायदेशीर व सरसकट बाह्य जिल्ह्यातील शिपाई यांची सुरू असलेली भरती तातडीने थांबवावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांच्यावतीने अध्यक्ष विजय खरपडे व उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांची भेट घेऊन केली. या प्रक रणी जि. प. सदस्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अलीकडेच शासनामार्फत बंद केलेल्या अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील शिपाई यांना पालघर जिल्हा परिषदेने सामावून घेतले होते. या प्रकरणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी शिक्षण उपसंचालकांना पत्र लिहून तशी तयारीही दर्शविली. मात्र या योजनेतील विशेष शिक्षक व परिचर (शिपाई) यांना राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये सामावून घेण्याचा शासन निर्णय असल्यामुळे ही भरती बेकायदेशीर असल्याचे व ती थांबविण्याची सूचना जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील यांनी सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच ही भरती केल्यामुळे येथील स्थानिकांवर अन्याय होणार असल्याचे ही त्यांनी यावेळी म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय सदस्यांनी एकत्र येत ती रद्द करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गुरुवारी त्यांची भेट घेऊन केली. ही भरती जिल्ह्याबाहेरील होत असलेली भरती न थांबवल्यास सर्व जिल्हा परिषद सदस्य आंदोलनाचा पवित्रा घेतील असा इशारा ह्यावेळी देण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या गेल्या सर्वसाधारण सभेत एकमुखी आक्षेप घेण्यात आल्यानंतर हे प्रकरण पडताळणीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले होते. असे असताना जिल्हापरिषदे कडे मंत्रालयातून नव्याने ९० शिपायांची समायजोनासाठी यादी पाठविण्यात आली आहे.
ज्या शासन परिपत्रक आणि कक्ष अधिकारी यांच्या आधारे हे समायोजन सुरू आहे ते चुकीचे आणि कायद्याला धरून नसल्याचे मत यावेळी अध्यक्ष विजय खरपडे व उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे मांडले. असे झाल्यास पालघर जिल्ह्यातील तरु णांवर अन्याय होईल असा युक्तीवाद ही यावेळी करण्यात आला. ही भरती सुरू राहिली तर सर्व सदस्य १५ दिवसानी आंदोलन छेडतील असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या बेकायदेशीर भरती विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष निलेश गंधे, माजी अध्यक्ष सुरेखा थेतले, माजी उपाध्यक्ष सचिन पाटील, समिती सभापती अशोक वडे, दामोदर पाटील, धनश्री चौधरी व सर्वपक्षीय सदस्य सहभागी झाले होते.
विश्वासात न घेता भरती प्राक्रिया
अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील विशेष शिक्षक व परिचर (शिपाई) यांना राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये सामावून घेण्याचा १५ सप्टेंबर २०१० रोजीच्या शासन निर्णयाचा आधार घेऊन पालघर जिल्ह्यात या पूर्वी ८० शिपायांना सामावून घेण्यात आले.
रिक्त जागांसाठी मागणी करताना किंवा समायोजनामधून आलेल्या शिपायांना रु जू करताना तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, जी.प.सदस्य यांना जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी यांनी कळविणे अपेक्षित असताना त्यांना
या बाबतीत कळविण्यात
आले नव्हते.
जिल्हा परिषदेच्या कोणत्याही पदाधिकाºयांना किंवा एकही जी.प सदस्यांना विश्वासात न घेता ही शिपाई भरती प्रक्रि या राबविल्याचा आरोपही येथे होत आहे .
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेलो असता त्यांनी काही दिवसांची मुदत मागून शासनामार्फत याबाबतीत मार्गदर्शन घेणार असल्याचे सांगितल. तसेच यावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषदेचे सर्वपक्षीय सदस्य आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. मंगळवारी याबाबतीत जिल्हा परिषदेचे शिष्टमंडळ मंत्रालयात जाऊन पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहोत. - निलेश गंधे, उपाध्यक्ष जि .प.पालघर