वसई-विरारच्या ‘रिक्षा गँग’ला वेळीच रोखा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:23 AM2019-04-26T00:23:45+5:302019-04-26T00:24:34+5:30

राहुल गांधी पंतप्रधान झाले : तर देश कार्टुन नेटवर्क बनेल - आदित्य ठाकरे

Stop Vasai-Virar's 'Rickshaw Gang' from time to time | वसई-विरारच्या ‘रिक्षा गँग’ला वेळीच रोखा

वसई-विरारच्या ‘रिक्षा गँग’ला वेळीच रोखा

Next

डहाणू : महायुती समोर संघटना नसून गुंडांची टोळी आहे, अशी टीका युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली. ही टोळी तुमची जमीन लुटणारी, दादागीरी करणारी आहे. संवादातून चर्चा करत असतांना महायुतीचेच सरकार येईल असा विश्वास जनता व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना महायुतीच्या सभेला ते गुरुवारी डहाणूत आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संपर्क प्रमुख रविंद्र फाटक, जिल्हाप्रमुख राजेश शहा, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे, माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ, उपजिल्हाप्रमुख संतोष शेट्टी, युवा पदाधिकारी हेमंत धर्ममेहेर, महीला विकास महामंडळ जिल्हा प्रमुख ज्योती ठाकरे, नगराध्यक्ष भरत राजपूत श्रमजीवी संघटनेचे रामभाऊ वारणा, श्रमजीवी जिल्हाध्यक्ष सुरेश रिंजड ज्योती मेहेर, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, श्रीनिवास वनगा, संजय पाटील, संजय कांबळे यासह पदाधिकारी उपस्थित होते.

महाआघाडीमध्ये सर्वांना पंतप्रधान बनवायचे आहे. राहुलजी ओसामाला ओसमाजी म्हणतात. आणि सावरकरांना कायर डरपोक म्हणतात. देशाचा विचार करुन मतदान करा.राहुल गांधी पंतप्रधान केले तर देश कार्टुन नेटवर्क बनेल अशी टिकाही त्यांनी केली. महायुतीची सत्ता येण्यापूर्वी ५ वर्षे वेगळी होती. काँग्रेसचा हात खिशात होता. जनतेचे पैसे खात्यात गेले. काँग्रेसने तेलगी, सिंचन, टू- जी चे घोटाळे केले आहेत. त्यामुळे आमची पाच वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीचे पाप धुण्यात गेली. मात्र पुढची पाच वर्ष महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी जाणार आहेत. रस्ते, उद्योग एअरपोर्ट तयार होत आहेत. उद्योगातून रोजगार मिळत आहे. चौपदरीकरण होत आहे. सिंचनाची कामे होताना दिसत आहेत. पापाचा पैसा हातात घेऊ नका, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेचे बटण दाबावे लागेल. ३७० कलम ठेवुन, देशद्रोहाचे कलम काढून, ओमर अब्दुल्लांना काश्मिरमध्ये स्वतंत्र पंतप्रधआन नेमण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचे आदित्य म्हणाले.
महाआघाडीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांनी बहुजन विकास आघाडी पक्ष नसून संघटना आहे. २००९ ते १४ साली विरोधकांना निवडुन दिले होते. या काळात बळीराम जाधव यांनी संसदेत एकही प्रश्न विचारला नाही. त्यांना स्वत:चे लेटर हेड विचारावे लागते. सरकारी, वन विभागाच्या जमीनी संपल्या आता सफाळा, पालघर बोईसर डहाणुकडे सरकले आहेत. माझ्याकडे पालघर जिल्हयाच्या विकासाचा रोड मॅप तयार आहे असेही गावीत म्हणाले राष्ट्रवादी, काँग्रेस विकली गेल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

Web Title: Stop Vasai-Virar's 'Rickshaw Gang' from time to time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.