शिवसेनेचा बोईसर ग्रामपंचायतीसमोर रास्ता रोको

By admin | Published: February 20, 2017 05:20 AM2017-02-20T05:20:53+5:302017-02-20T05:20:53+5:30

शिवसेनेच्या बोईसर येथील सहा आसनी रिक्षा युनियनच्या कार्यालयाची केबिनचे अतिक्र मण हटाव मोहिमेच्या वेळी त्या केबिन

Stop the way before Shivsena's Boisar Gram Panchayat | शिवसेनेचा बोईसर ग्रामपंचायतीसमोर रास्ता रोको

शिवसेनेचा बोईसर ग्रामपंचायतीसमोर रास्ता रोको

Next

बोईसर : शिवसेनेच्या बोईसर येथील सहा आसनी रिक्षा युनियनच्या कार्यालयाची केबिनचे अतिक्र मण हटाव मोहिमेच्या वेळी त्या केबिन मधील शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याचा आरोप करु न सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि रिक्षाचालकांनी गुरु वारी रात्री बोईसर ग्रामपंचायती समोर रस्ता रोको केला.
बोईसर ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या अतिक्र मण हटाव मोहीमेमध्ये बोईसर नवापुर रस्त्या वरील ग्रामीण रु ग्णालया बाहेर असलेली ही केबिन जेसीबीच्या सहाय्याने गुरु वारी संध्यकाळी हटविण्यात येताना बोईसरचे उप सरपंच राजेश करवीर व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा गणपती, बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याची तक्रार बोईसर पोलीस स्टेशनला करु न त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
त्या वेळी आमदार अमित घोडा, पालघर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे, माजी जिल्हा प्रमुख प्रभाकर राऊळ, पंचायत समितीचे उप सभापति मनोज संखे, बोईसर शहर प्रमुख नीलम संखे, पंचायत समिति सदस्य मुकेश पाटील पदाधिकारी कल्पेश पिंपळे यांच्या सह शिवसैनिक आणि सेनेच्या रिक्षा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनला उपस्थित होते. म्हात्र गुन्हा दाखल होत नसल्याने रात्री बोईसर ग्रामपंचायती समोर रस्ता रोको सुरु केला.
दरम्यान, पालघर जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक बी. जी. यशोद दाखल झाले अखेर रात्री उशिरा उपसरपंच राजेश करवीर व अन्य तीन जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. दरम्यान, या प्रकरणाला राजकीय किनार असली तरी अवमानाच्या आरोपामुळे वातावरण तंग बनले होते. (वार्ताहर)
ती केबिन हटविण्यासाठी एक दिवसापुर्वी सांगितले होते. परंतु त्यांनी स्वत: हून ती हटविली नाही. मला शिवाजी महाराज आणि बाळासाहेब आदरणीय आहेत. मात्र, त्या केबिन मध्ये कुठल्याही प्रतिमा नव्हत्या.
- राजेश करवीर, उप सरपंच, बोईसर
अतिक्र मण हटविण्याविरोधात आम्ही नाहीत. परंतु ज्या पद्धतीने आदरणीय व्यक्तीच्या प्रतिमा हटविल्या गेल्या तो प्रकारर आमचा संताप वाढविणारा होता.
- प्रभाकर राऊळ, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख

Web Title: Stop the way before Shivsena's Boisar Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.