दुसऱ्या दिवशीही विक्रमगडमध्ये वादळ

By Admin | Published: June 4, 2017 04:08 AM2017-06-04T04:08:51+5:302017-06-04T04:08:51+5:30

या परिसरात सलग दुसऱ्या दिवशी थैमान घालणाऱ्या वादळाने अनेक घरांचे पत्रे उडविले असून त्यांना बेघर केले आहे. याच वेळी झालेल्या विजांच्या कडकाटाने सगळ्यांना

Storm in Vikramgad in the next day | दुसऱ्या दिवशीही विक्रमगडमध्ये वादळ

दुसऱ्या दिवशीही विक्रमगडमध्ये वादळ

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क

विक्रमगड : या परिसरात सलग दुसऱ्या दिवशी थैमान घालणाऱ्या वादळाने अनेक घरांचे पत्रे उडविले असून त्यांना बेघर केले आहे. याच वेळी झालेल्या विजांच्या कडकाटाने सगळ्यांना भयभीत केले होते. दोन दिवसांमध्ये आलेल्या वादळाने सर्वसामान्याचे मोठे नुकसान केले आहे़ कुणाचे ६०, कुणाचे ३० तर कुणाचे २० ते कुणाचे ७० पत्रे उडाल्याने पावसाच्या पाण्यामध्ये घरातील धान्यांच्या गोण्याच्या गोण्या भिजून गेल्याने मोठयाप्रमाणावर नुकसान झालेले आहेत़ तर अनेकांच्या घरावर झाडे उन्मळून पडल्याने घरे जमीनदोस्त झाली आहेत़
तर दुसऱ्या दिवशी झालेल्या या मुसळधार पावसाबरोबर आलेला वादळी वारा व विजेने एकाला आपले प्राण गमवावे लागलेले आहे़ २ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आदिवासी शेतकरी सोन्या देवजी कुवरा (४५) रा़ शिळ पैकी दांडेकरपाडा हा इसम घराच्या ओटयावर आणखी दोघांसोबत गप्पा मारत असतांना अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला़ मात्र दैवयोगाने बाजूस असलेले इतर दोघे बचावले या सर्वांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथे हलविण्यांत आले़ मात्र सोन्या कुवरा यांचा अगोदरच मृत्यू झाला होता इतर दोघांनाही अ‍ॅडमीट करण्यात आले. तहसिलदार सुरेश सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली व त्याप्रमाणे अहवाल सादर केला व नैसर्गीक आपत्ती म्हणून सोन्या देवजी कुवरा यांच्या कुटुंबियांना तत्काळ ४ लाखाची मदत मंजूर केली. ही रक्कम त्यांच्या पत्नीचे खाते बॅकेमध्ये उघडून त्यात जमा करण्यांत येणार आहे़
तसेच इतर सवादे, खांड या गावातील काही लोकांच्या घरासमोरील झाडांवर देखील वीजा पडून त्यांना धक्का बसला असल्याने त्यांचीही चौकशी तहसिलदारांनी त्यांनाही अ‍ॅडमीट करण्यात आले असून त्यांना आता कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे सांगीतले़
शेतकऱ्यांच्या घरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून शासनाच्या जिआरप्रमाणे जर ज्या भागात घराचे नुकसान झाले आहे़ त्याठिकाणी किमान ६५ मि़ मि़ पावसाची नोंद होणे आवश्यक आहे अशा ठिकाणचे पक्के घर पडल्यास ५,२००, साधे घर पडल्यास ३,४०० व साधेघर पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यास ४,२०० याप्रमाणे भरपाई मिळते़

गेल्या दोन वर्षामध्ये अशा प्रकारचा वादळी वारा व पाऊस व वीजा कोसळणे अशी नैसर्गीक आपत्ती आली नव्हती, यावर्षी दोन दिवसांत विक्रमगडमधील वातारवणच बदलून मोठया प्रमाणावर घरांची पडझड झाली आहे़ झाडे, वीजेचे पोल पडण्याचे वीज गायब होण्याचे प्रकार घडले आहेत. ़विजेच्या धक्याने घाबरलेले खांड व सवादे तसेच शिळ येथील काही नागरिंकांच्या घरी जाऊन मी चौकशी केली व त्यांची विचारपूस करुन उपाय योजना करण्यात आली आहे़ तसेच शिळ पैकी दांडेकरपाडा येथील सोन्या देवजी कुवरा हा इसम विजेच्या धक्याने मृत्यू पावला असून त्यांच्या कुंटुंबांला नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाकडून तत्काळ ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यांत आली आहे व लवकरच ही रक्कम त्यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे़
-सुरेश सोनवणे,
तहसिलदार विक्रमगड

Web Title: Storm in Vikramgad in the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.