विरार लोकलमध्ये प्रवाशाला मारहाण, प्रवाशाच्या डोळ्याला इजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 05:28 AM2018-04-10T05:28:50+5:302018-04-10T05:28:50+5:30
विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या पुरुषांच्या डब्यात रविवारी रात्री चौथ्या सीटवर बसण्यावरून मिरारोड स्थानकात मारहाण झाली.
वसई : विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या पुरुषांच्या डब्यात रविवारी रात्री चौथ्या सीटवर बसण्यावरून मिरारोड स्थानकात मारहाण झाली. तिस-या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाला आत सरकण्यास सांगून चौथ्या सीटवर बसण्याचा प्रयत्न करणाºया पुरुषाला, महिला प्रवाशाच्या सहकाºयांनी बेदम मारहाण केली. रात्र झाली असल्याने या प्रकरणी कोणीही तक्रार दाखल केली नाही.
चर्चगेटवरून रात्री १०.१८ वाजता सुटलेली विरार गाडी रात्री ११.२० ला मीरारोड येथे पोहोचली. तेव्हा अचानक प्रवाशांच्या दोन गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. पुरुषांच्या डब्यात तिसºया सीटवर एक महिला बसली होती. एका पुरुषाने या महिलेला आत सरकण्यास सांगून चौथ्या सीटवर बसण्यासाठी जागा द्यावी, असे सांगितले. त्यामुळे तिच्यासोबत असलेल्या पुरुष प्रवाशांना राग आला. त्यात त्यांची बाचाबाची झाली. महिलांसाठी विशेष डब्बे व ट्रेन असताना पुरुषांच्या डब्ब्यामध्ये महिला का प्रवेश करतात, असा प्रश्न डब्यातील पुरुषांनी या महिलांना केला. या बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाले. या मारहाणीत त्या प्रवाशाच्या डोळ््याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकारामुळे आजूबाजूचे प्रवासी गोंधळून गेले होते. इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणी समजून घायला तयार नव्हते. त्या डब्यात उभ्या असलेल्या इतर महिलांनाही धक्काबुक्की सहन करावी लागली. शेवटी इतर प्रवाशांच्या मध्यस्थीने प्रकरण आटोक्यात आले.