वैतरणा पुलाचे जानेवारीत स्ट्रक्चरल आॅडिट, अखेर पश्चिम रेल्वे प्रशासन झाले जागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:37 AM2017-11-14T01:37:03+5:302017-11-14T01:37:14+5:30

पश्चिम रेल्वेवरील अतिशय महत्वाचा मानल्या जाणाºया वैतरणा रेल्वे पूलाचे जानेवारी महिन्यात स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार आहे.

 Structural audit in Vaitarna bridge in January, finally got Western Railway Administration | वैतरणा पुलाचे जानेवारीत स्ट्रक्चरल आॅडिट, अखेर पश्चिम रेल्वे प्रशासन झाले जागे

वैतरणा पुलाचे जानेवारीत स्ट्रक्चरल आॅडिट, अखेर पश्चिम रेल्वे प्रशासन झाले जागे

Next

शशी करपे
वसई : पश्चिम रेल्वेवरील अतिशय महत्वाचा मानल्या जाणाºया वैतरणा रेल्वे पूलाचे जानेवारी महिन्यात स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार आहे. या आॅडिट मधूनच पुलाचे रेती उपशामुळे झालेले नुकसान, पुलाची क्षमता, रचनात्मक मजबुती आदींंची माहिती समोर येणार आहे.
वैतरणा खाडीत होणाºया रेती उपशामुळे पुलाला धोका असल्याची तक्रार डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थांसह अनेकांनी केली होती. काही वर्षांपूर्वी एका पुलाजवळील भरावही वाहुनही गेला होता. यानंतर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी, हितेश सावे, हिमांशू वर्तक, प्रथमेश प्रभुतेंडोलकर आदींनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत अवैध रेती उपशामुळे या पुलांना गंभीर धोका निर्माण झाला असल्याची माहिती उजेडात आली होती. तेव्हापासून पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी केली जात आहे.
मात्र, पावसाळ््यापूर्वी पुलाची डागडुजी केली जाते. त्यामुळे स्ट्रक्चरल आॅडिटची आवश्यकता नसल्याचे उत्तर रेल्वे प्रशासनाने दिले होते. एल्फिन्स्टन रोड पुलावरील दुर्घटनेनंतर वैतरणा रेल्वे पूलाच्या स्ट्र्क्चरल आॅडिटसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर पश्चिम रेल्वे वैतरणा पुलाचे स्ट्र्क्चरल आॅडिट जानेवारी महिन्यात केले जाईल असे लेखी पत्र दिले. रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या रिसर्च डिझाईन्स अँड स्टंँडर्डस आॅर्गनायझेशनमार्फत येत्या जानेवारीत वैतरणा रेल्वे पूल क्रमांक ९२ आणि ९३ चे स्ट्रक्चरल आॅडिट केले जाणार आहे.

Web Title:  Structural audit in Vaitarna bridge in January, finally got Western Railway Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.