‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:41 AM2019-08-17T01:41:17+5:302019-08-17T01:41:28+5:30

पालघर रेल्वे स्टेशनवरून सुटलेली वलसाड शटल ट्रेन पकडण्याच्या नादात पाय घसरून गाडीखाली जाणाऱ्या...

Student save in Palghar station | ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’

‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’

Next

पालघर : पालघररेल्वे स्टेशनवरून सुटलेली वलसाड शटल ट्रेन पकडण्याच्या नादात पाय घसरून गाडीखाली जाणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यात पोलीस शिपाई अरविंद वरुटे याला यश मिळाले आहे. या घटनेत ते स्वत: जखमी झाले आहेत.

पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात एफ.वाय.बी.कॉम. च्या वर्गात शिकणाºया मोहम्मद अमीर आरिफ मुंसी (१८, रा. एच.डी. बेहराम सोसायटी मल्यान, डहाणू) हा आपले सकाळचे कॉलेज आटपून डहाणू येथे घरी जाण्यासाठी पालघर रेल्वे स्टेशनकडे येत असताना. प्लॅटफॉर्म क्र. १ वर उभी असलेली वलसाड शटल सुटली. या गाडीने वेग घेतला असतानाही मोहम्मद अमीर याने धावत जात ती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी वेगात असल्याने डब्याच्या दांडीला पकडलेला त्याचा हात सुटून तो प्लॅटफॉर्मवरून घसरून प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मधील गॅपमध्ये जाऊ लागला. प्लॅटफॉर्मवर असलेले पोलीस शिपाई वरूटे यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ धावत जात त्या विद्यार्थ्याचे दोन्ही हात पकडीत त्याला त्या गॅपमध्ये पडण्यापासून वाचवले.

गाडी वेगाने निघून गेल्यानंतर ते दोघेही रेल्वे रुळात पडले. २ नंबर प्लॅटफॉर्मवर असलेले पोलीस शिपाई उबाळे आणि पोलीस शिपाई गाडेकर यांनी रुळात उतरून जखमी विद्यार्थी आणि सहकारी पोलिसास ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. पालघर रेल्वे पोलीस स्टेशन मधील कार्यरत पोलीस शिपाई अरविंद वरु टे आणि इतर कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका अठरा वर्षाच्या मुलाचा जीव वाचिवण्यात त्यांना यश आले. या तरुणाच्या कमरेला मार लागला आहे.

Web Title: Student save in Palghar station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.