आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:34 PM2017-07-26T23:34:57+5:302017-07-26T23:34:57+5:30
‘रयत शिक्षण संस्थेच्या’ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक, माध्यमिक व उच्य माध्यमिक आश्रमशाळेतील सहावीत शिकणाºया गोवर्धन राऊत याने मंगळवारी केलेल्या आत्महत्येमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे.
मोखाडा : ‘रयत शिक्षण संस्थेच्या’ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक, माध्यमिक व उच्य माध्यमिक आश्रमशाळेतील सहावीत शिकणाºया गोवर्धन राऊत याने मंगळवारी केलेल्या आत्महत्येमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे.
मंगळवारी सायंकाळी घोसाळी - लोहारपाडा रस्त्यालगत असलेल्या टेम्पोच्या बॉडीला गळफास लावून त्याने केलेली आत्महत्या संशयास्पद असून ती हत्या की आत्महत्या? असा प्रश्न निर्माण झालेला आहे या घटनेचा अधिक तपास मोखाडा पोलीस करीत असले तरी सत्य बाहेर येईल का? हा प्रश्न आहे. जव्हार प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा अशा चार तालुक्यात ३३ शासकीय व अनुदानित आश्रमशाळा चालवल्या जातात सोयी सुविधांपासून त्या कायमच वंचित राहिलेल्या आहेत. घटनाग्रस्त गभालपाडा या आश्रमशाळेत पहिली ते बारावी या वर्गात २८१ मुले व २६५ मुली असे एकूण ५४६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अन्य सुविधा सोडा, साधी शौचालयाची व्यवस्था धड नाही. जेथे शिकायचे तेथेच झोपायचे, अंघोळीला एक किलो मिटर अंतरावरील नाल्यावर जावे लागते. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या मतरदार संघात हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. यात दोषी असलेल्या कर्मचाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.