विद्यार्थ्यांनी पाहिला मोदींवरील लघुपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:36 AM2018-09-21T03:36:33+5:302018-09-21T03:36:35+5:30

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जीवनावर आधारित चलो जिते है हा लघुपट मंगळवारी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविण्यात आला.

Students see short films on Modi | विद्यार्थ्यांनी पाहिला मोदींवरील लघुपट

विद्यार्थ्यांनी पाहिला मोदींवरील लघुपट

Next

तलासरी : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जीवनावर आधारित चलो जिते है हा लघुपट मंगळवारी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढिदवस १७ सप्टेंबर ला असतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ सप्टेंबरला राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी दिग्दिर्शत केलेला ३० मिनिटांचा चलो जिते है हा लघुपट सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शाळांमध्ये दाखविण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवन प्रवास, त्यांनी केलेला संघर्ष आणि चहावाला ते पंतप्रधानपदापर्यंत केलेला प्रवास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर ‘चलो जीते है’ लघुपट बनविला आहे. या लघुपटातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, देशाच्या पंतप्रधानांची माहिती व्हावी, हा उद्देश यामागे असल्याचे सांगितले जात आहे. ३० मिनिटांचा असलेल्या या लघुपटाचे शाळांमध्ये लाइव्ह स्ट्रिमिंगद्वारे प्रक्षेपण करण्यात आले.
त्यासाठी शाळांमध्ये लॅपटॉप, डेस्कटॉप, संगणक, प्रोजेक्टर आणि स्क्रीन आणि साउंड सिस्टिमची व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: Students see short films on Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.