उद्धट कर्मचा-यांमुळे विद्यार्थी ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:23 AM2017-11-10T00:23:02+5:302017-11-10T00:23:02+5:30
एस.टी. महामंडळाकडून प्रवाशाना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत त्यात प्रामुख्याने शैक्षणिक, मासिक, तिमाही पास, आवडेल तिथे प्रवासाचा पास, दहा टक्के सवलत
वाडा : एस.टी. महामंडळाकडून प्रवाशाना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत त्यात प्रामुख्याने शैक्षणिक, मासिक, तिमाही पास, आवडेल तिथे प्रवासाचा पास, दहा टक्के सवलत पास यांचा समावेश आहे. मात्र, स्थानकातील उद्धट व उर्मट कर्मचाºयामुळे पास वेळेत उपलब्ध होत नाहीत त्या मुळे विद्यार्थ्यांना चार चार तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. हा कारभारी दहा वाजता येतो तर कैकवेळा विद्यार्थी व इतर कर्मचाºयांशी शालीनतेने वागत नसल्याचे काही एसटी कर्मचाºयांनीच सांगितले आहे.
तालुक्यात पी.जे. हायस्कूल व महाविद्यालय आणि स्वामी विवेकानंद शाळा व महाविद्यालया सारख्या शिक्षण संस्था आहेत. तसेच ओंदे महाविद्यालय आहे. या शिवाय येथे अनेक लहान मोठे खाजगी क्लासेस आहेत. त्या निमित्ताने वाड्यामध्ये दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. यातील बहुसंख्य विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येत असल्याने त्यांना मासिक, त्रेमासिक पासची गरज असते. हे पास वेळेवर मिळत नसल्याने त्यांना चार चार तास रांगेत उभे रहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी वाडा तालुका प्रवासी संघटनेचे सचिव प्रा. किरण थोरात यांनी आगार व्यवस्थापकांना लेखी निवेदन दिले आहे.
वाडा बस स्थानकात एसटी कडून दिल्या जाणाºया योजनांचा फलक तसेच आवडेल तेथे प्रवासी पास या बाबत काहीही माहिती दिसून येत नाही. शिवाय पास खिडकी उघडण्याची वेळ सुद्धा लिहिली नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
पास देण्याची वेळ सकाळी सातची ठेवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.