पश्चिम रेल्वेच्या गोंधळाने विद्यार्थी परीक्षेला मुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:11 AM2017-11-23T03:11:48+5:302017-11-23T03:12:34+5:30
पालघर : पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून दाखविण्यात येणा-या दुजाभावाचा फटका केळवे येथील स्थापत्य अभियांत्रिकी चे शिक्षण घेणा-या पल्लव हटकर याला बसला असून त्याला परीक्षेस मुकावे लागले.
पालघर : पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून दाखविण्यात येणा-या दुजाभावाचा फटका केळवे येथील स्थापत्य अभियांत्रिकी चे शिक्षण घेणा-या पल्लव हटकर याला बसला असून त्याला परीक्षेस मुकावे लागले.
विरार येथे परीक्षेला जाण्यासाठी दुपारची मुंबईकडे जाणारी अहमदाबाद पॅसेंजर पकडण्यासाठी पल्लव हा वेळेवर केळवे स्थानकावर आला होता. दरम्यान, गाडी आल्यावर तो पॅसेंजरमध्ये बसला मात्र नेहमीच उशिराने धावणारी ही गाडी पाठीमागून आलेल्या सयाजी नगरी एक्सप्रेस व पश्चिम एक्सप्रेस या गाडयांना पासिंग देण्यासाठी तब्बल १ तास ३० मिनिटे केळवे स्थानकावर स्लायडींगला थांबवून ठेवण्यात आली. याचा फटका पल्ल्वला बसला व परीक्षा केंद्रावर उशिराने पोचल्यामुळे त्याला परीक्षेस बसू दिले गेले नाही. पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या प्रवाशांना नेहमीच अशी दुजाभावाची वागणूक दिली जाते. तिचा फटका एका विद्यार्थ्याला नाहक सोसावा लागला. याला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे पल्लवने म्हटले असून त्याने केळवे रोड स्थानकात तशी तक्रारही दाखल केली आहे.
>पश्चिम रेल्वेने विरार ते डहाणू पर्यंतचा भागाला उपनगरीय सेवेचा दर्जा दिला आहे. त्या माध्यमातून या भागातील रेल्वे प्रवाशांकडून विविध करापोटी आजपर्यंत कोट्यवधी रुपयाची वसूली केली आहे. अहमदाबाद पेसेंजर ही गाडी नेहमीच उशिराने धावत असून मागच्या महिन्याच्या तीस फेºयापैकी २२ वेळा ती १५ मिनिटे ते १ तासापेक्षा जास्त उशिराने आल्याचा आरोप डहाणू वैतरणा सेवाभावी संस्थेने केला आहे. या गाडीच्या विलंबाचा फटका येथील सर्वांनाच बसतो आहे.