मारकुट्या पोलीस उपनिरीक्षकाची बदली

By Admin | Published: June 15, 2016 12:39 AM2016-06-15T00:39:34+5:302016-06-15T00:39:34+5:30

एका तरुणाला मध्यरात्री मारहाण केल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह एका पोलिसाची पालघर पोलीस अधिक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली

Sub-inspector of the Maritime Police transferred | मारकुट्या पोलीस उपनिरीक्षकाची बदली

मारकुट्या पोलीस उपनिरीक्षकाची बदली

googlenewsNext

विरार : एका तरुणाला मध्यरात्री मारहाण केल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह एका पोलिसाची पालघर पोलीस अधिक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी कुटुंबियांनी अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केले.
वसंती नगरी येथे राहणाऱ्या आदित्य डोंगरे (२७) या तरुणाची ९ जूनच्या मध्यरात्री साध्या वेशातील आणि खाजगी वाहनातून आलेल्या पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यात आदित्यने एका पोलिसावर हात उगारला होता. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांनी आपल्याला मारहाण केली. तसेच तुळींज पोलीस ठाण्यात तीन तास डांबवून मारहाण केल्याची तक्रार केली आहे. शिवदे व अन्य पोलिसांनी अपहरण करून मारहाण केली. पैसे काढून घेतली. मोबाईल फोडून टाकला. अशा तक्रारी केल्यानंतर शिवदे यांच्यासह दोन पोलिसांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. दरम्यान, पोलीस कारवाई करीत नसल्याने डोंगरे कुटुंबियांनी वसई अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालासमोर धरणे धरले होेते. त्यानंतर बदल्या झाल्या.मात्र, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले नाहीत. (वार्ताहर)

मारहाण करणारे साध्या वेशात होते, ते पोलीस आहेत याची कल्पना नव्हती. त्यांनी मारहाण केल्याने आपण स्वरक्षणासाठी हात उगारला. मात्र, त्यानंतर माफीही मागितली होती.
-आदित्य डोंगरे

कायदा हातात घेणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यासाठी लोकशाही पद्धतीने लढा सुरु ठेवू
- डॉ. विनायक डोेंगरे ,
आदित्यचे वडिल

Web Title: Sub-inspector of the Maritime Police transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.