वसई पूर्वेतील कोविड सेंटरमध्ये झाली लसीकरणची यशस्वी "ड्राय रन"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 07:04 PM2021-01-08T19:04:03+5:302021-01-08T19:06:18+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: वसई विरार महानगरपालिकेने लसीकरणासाठी रंगीत तालीम म्हणून पालिका विभागातील एकूण 25 लाभार्थी तयार करून त्यांना ड्राय रनचा संदेश पाठविला होता.
वसई - शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वसई-विरार शहर महापालिकेने शुक्रवार दि 8 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता वरुण इंडस्ट्री वालीव पूर्वेस पालिका आयुक्त गंगाथरन यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण बाबतीतली रंगीत तालीम उरकून घेतली. यावेळी त्यांच्या सोबत पालिका उपायुक्त व मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी आदी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी लसीकरण कशाप्रकारे करता येईल याची कोरोना लसीकरणाची यशस्वी ड्राय रन (रंगीत तालीम) घेतली व ती यशस्वीपणे पार पडली असल्या ची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमतला दिली
दरम्यान सध्या सर्वत्र राज्यभर जिल्हाभर कोविडवरील लसीकरण कशा प्रकारे करण्यात येईल याची पूर्वतयारी म्हणून ड्राय रन कार्यक्रम सुरू आहेत. यावेळी आयुक्तांनी सांगितले की, या ड्राय रनमुळे लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एक मोठा आत्मविश्वास तयार होऊन तो प्रत्यक्ष लस देते वेळी तो वाढणार आहे, एकूणच वसई विरार महानगरपालिकेने लसीकरणासाठी रंगीत तालीम म्हणून पालिका विभागातील एकूण 25 लाभार्थी तयार करून त्यांना ड्राय रनचा संदेश पाठविला होता. त्यानुसार प्रथम या लाभार्थ्यांची को- विन ॲपवर नोंदणी झाली.
पहिल्या टप्प्यात शासकीय खाजगी रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या यात समावेश असणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पोलीस सुरक्षारक्षक आणि तिसऱ्या टप्प्यात वयोवृद्ध आणि व्याधिग्रस्त लाभार्थीना लसीकरण करण्यात येणार आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर टप्प्याटप्प्याने दररोज 100 लाभार्थींचे लसीकरण केले जाणार आहे याकरता महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण 6 हजार आरोग्य कर्मचारी को -विन एप वर असून त्यांना याचा लाभ मिळणार आहे. महानगरपालिकेने एकूण 10 लसीकरण केंद्र तयार केले असून एका केंद्रावर 100 लाभार्थी असे 10 केंद्रावर दिवसाला 1 हजार लाभार्थींना लसीकरण केले जाणार आहे
AEFI मॅनेजमेंट सेंटरची नियुती
लसीकरणानंतर जर काही दुष्परिणाम झाले तर अशा दुष्परिणाम झालेल्या रुग्णांकरिता (AEFI) कमिटी स्थापन करण्यात आली असून याकरता AEFI मॅनेजमेंट सेंटर निश्चित करण्यात आलेले आहे.
दरम्यान शुक्रवारी महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या या रंगीत तालीम वेळी महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथ र न ,उपायुक्त डॉ किशोर गवस मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा वाळके,उप वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.जुईली वनमाळी डॉ. राजेश चव्हाण ,डॉ.अश्विनी माने आणि डॉ. मरिना फिलिप्स आदी उपस्थित होते.