नागपूर अधिवेशनात करणार आत्महत्या, सेवानिवृत्त पोलिसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:39 AM2018-07-06T03:39:16+5:302018-07-06T03:39:30+5:30

पोलीस दलात अंमलदार म्हणून कार्यरत असलेले व सध्या स्वेच्छानिवृत्ती घेतलेले दत्तात्रेय नाईक हे मागील २५ वर्षा पासून सरकारी नोकरा तर्फे बचाव प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत.

 Suicides in Nagpur session, suicide of retired policemen | नागपूर अधिवेशनात करणार आत्महत्या, सेवानिवृत्त पोलिसाचा इशारा

नागपूर अधिवेशनात करणार आत्महत्या, सेवानिवृत्त पोलिसाचा इशारा

Next

पालघर : आपल्या कार्यालयात चौकशी साठी बोलावून आपल्याला बास्टर्ड म्हणून शिवीगाळ करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी निमित्त गोयल ह्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करून ३ महिने झाले तरी अप्पर पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ तक्रारदार सेवानिवृत्त पोलीस दत्तात्रेय नाईक यांनी विधीमंडळाच्या अधिवेशन काळात नागपूरला जाऊन आपण आत्महत्या करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या ‘आपले सरकार’ पोर्टल वर पत्र पाठवून दिला आहे.
पोलीस दलात अंमलदार म्हणून कार्यरत असलेले व सध्या स्वेच्छानिवृत्ती घेतलेले दत्तात्रेय नाईक हे मागील २५ वर्षा पासून सरकारी नोकरा तर्फे बचाव प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. ६ एप्रिल रोजी अधिकारी गोयल यांनी बोलविल्या प्रमाणे नाईक हे कसुरदार असलेल्या पोलीस उपनिरीक्षक उगले आणि शिपाई धोडी यांच्या सोबत त्यांच्या कार्यालयात हजर होते. यावेळी तू ज्यादा शाना बनता है, झूट बोलेगा तो फोर्जरी का केस बनाके अंदर डाल दूँगा अशी धमकी देऊन, यू बास्टर्ड अशी शिवी दिल्याची तक्र ार त्यांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य वरिष्ठांकडे केली होती. मात्र आपण असे अर्वाच्य शब्द कधी वापरत नाही असे सांगून विभागीय चौकशीतून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न नाईक हे करीत असल्याचा दावा गोयल यांनी केला आहे.
विभागीय चौकशीच्या नियमानुसार कसुरदार व बचाव प्रतिनिधी यांच्या समक्ष जबाब नोंदविणे गरजेचे असतांना नियम धाब्यावर बसवून कसूरदार व माझा न्यायहक्क हिरावून घेतल्याचा आरोप ही त्यांनी आपल्या तक्र ारीत केला होता.ह्या प्रकरणाचे संतप्त पडसाद पोलिसात उमटले होते.ह्या प्रकरणाची आपण चौकशी करणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण ह्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते.मात्र

नाईक म्हणतात, पोर्टेलवरून आपल्याला मिळाला रिप्लाय
या घटनेला ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही आपल्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने आपल्याला मोठा मनस्ताप झाला असून आपण आपल्या खिशात सुसाईड नोट लिहून अधिवेश काळात नागपूरला जाऊन आत्महत्या करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या ’आपले सरकार’पोर्टलवर त्यांनी दिला आह.े . हे इशारा पत्र नोंदवून घेण्यात आल्याचा रिप्लाय ही आपल्याला प्राप्त झाल्याचे दत्तात्रेय नाईक यांनी लोकमतला सांगितले. अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण ह्यांच्या मोबाईल वर प्रतिक्रि येसाठी अनेक वेळा संपर्क साधूनही त्यांनी तो उचलला नाही.

Web Title:  Suicides in Nagpur session, suicide of retired policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस