सनसिटी व तामतलाव; वसई गावात आगीच्या 2 घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 04:53 PM2020-08-06T16:53:25+5:302020-08-06T16:53:37+5:30
त्यामुळे कुठं कुठं वाहतुक कोंडी देखील झाली यात काही झाडे रात्री कोसळली असल्याने मदतकार्यात अडचण झाली नाही
आशिष राणे
वसई विरार शहरात मंगळवारी रात्री व बुधवारी दिवसभर झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे व त्यासोबत वादळी वाऱ्यांमुळे शहरांतील नवघर सनसिटी व तामतलाव, वसई गावात आगीच्या 2 घटना घडल्या असून 4 ठिकाणी 15 झाडे कोसळली तर 10 सर्प पकडल्याच्या वर्दीची नोंद पालिकेला प्राप्त झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमतला दिली आहे. नशीब बलवत्तर म्हणून वसई विरार शहरात कुठे ही जिवीतहानी झालेली नाही मात्र ठीकठिकाणी छोटी मोठी झाडे उन्मळून पडली परंतु कुठं ही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही यात प्रामुख्याने सनसिटी व वसई तामतलाव भागात आगीच्या दोन विविध घटना मात्र घडल्या असून काही मुख्य रस्त्यावर बुधवार रात्री उशिरा व गुरुवारी काही झाडे कोसळली. त्यामुळे कुठं कुठं वाहतुक कोंडी देखील झाली यात काही झाडे रात्री कोसळली असल्याने मदतकार्यात अडचण झाली नाही तरीही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कटर मशीन,मेक लिफ्ट, व कुऱ्हाडीने झाडे कापून दिवसरात काही वेळांनी मुख्य रस्ते मोकळे करून दिले
दरम्यान मागील चार दिवस झाले शहरात रविवार पासून पाऊस व वारा सुटला आहे त्यामुळे झाडाची पडझड सुरूच आहे, बुधवार रात्री व गुरुवारी देखील हा पडझडी चा प्रकार सुरूच होता.त्यात आता 2 आगीच्या घटनांची भर पडली. यामध्ये अग्निशमन दलाच्या विविध 6 केंद्रात वसई विरार व नालासोपारा येथून आगीची घटना, झाड व सर्प असल्याच्या वर्दी मिळाल्याने आणीबाणी व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक झाली.
यामध्ये शहरातील मुख्य अग्निशमन केंद्र असलेल्या आचोळे केंद्र ,बोळीज विरार पश्चिम ,फुलपाडा विरार पूर्व, ,श्रीप्रस्थ नालासोपारा पश्चिम ,सनसिटी दिवाणमान, व तांमतलाव ,वसई गाव अशा 6 पैकी 2 ठिकाणी आगीच्या घटना, 4 ठिकाणी एकूण 15 झाडे कोसळली व 10 सर्प मिळून आले असल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमत ला दिली.