पुरवठा विभागाचे संकेतस्थळ सदोष
By Admin | Published: February 17, 2017 12:14 AM2017-02-17T00:14:12+5:302017-02-17T00:14:12+5:30
धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने सुरू केलेल्या संकेतस्थळात पारदर्शकता नसल्याने व अपूर्ण माहिती असल्याने
पारोळ : धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने सुरू केलेल्या संकेतस्थळात पारदर्शकता नसल्याने व अपूर्ण माहिती असल्याने भ्रष्टाचारास वाव मिळत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. याबाबत वसई विरार जिल्हा कॉंग्रेसचे मिडिया प्रमुख किरण शिंदे यांनी तहसिलदारांकडे तक्र ार केली आहे.
पुरवठा विभागाकडे धान्यपुरवठ्याबाबत माहिती मागवली असता ती दिली जात नाही. ही माहिती संकेतस्थळावरून घ्या असे सांगितले जाते. पण संकेतस्थळावर ही माहिती नसते आणि जी माहिती असते ती दिशाभूल करणारी असते असा आरोप त्यांनी केला आहे.
या संकेतस्थळावर केंद्र व राज्य सरकारचा पुरवठ्याबाबतचा कुठलाही अध्यादेश नाही. केंद्र वा राज्य सरकारच्या तक्र ार निवारणाबाबतचे कोणतेही दूरध्वनी क्र मांक अथवा संपर्कासाठी ईमेल देखील दिलेले नाहीत.
मागील महिन्यात किती साठा आला त्याचा उल्लेख नसतो. हा संपूर्ण प्रकार भ्रष्टाचाराला पोषक असल्याचा आरोप करून हे संकेतस्थळ अद्ययावत करण्याची मागणी त्यांनी केली
आहे.