भाई ठाकूरच्या साम्राज्याला सुरुंग लावणारा दुबे खून खटला, नेमके काय घडलेले, ज्याने देश हादरलेला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 05:15 AM2023-05-25T05:15:50+5:302023-05-25T05:17:01+5:30

१९९०च्या दशकामध्ये वसई-विरार परिसरात भाई ठाकूर टोळीचा दबदबा होता. कोणाच्याही जागेवर अतिक्रमण करून जागा ताब्यात घेतल्या जात होत्या.

Suraj Dubey murder case that undermined Bhai Thakur's empire, what exactly happened, shook the country | भाई ठाकूरच्या साम्राज्याला सुरुंग लावणारा दुबे खून खटला, नेमके काय घडलेले, ज्याने देश हादरलेला

भाई ठाकूरच्या साम्राज्याला सुरुंग लावणारा दुबे खून खटला, नेमके काय घडलेले, ज्याने देश हादरलेला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
नालासोपारा : ३४ वर्षांपूर्वी ९ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वेस्थानकावर पेपर वाचत बसलेल्या बिल्डर सुरेश दुबेवर सहा ते सात आरोपींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ज्या नागरिकांनी रेल्वे प्लॅटफाॅर्मवरचा हा थरार पाहिला होता, ते आजही त्याविषयी दबक्या आवाजात बोलतात. या हत्याकांडामुळे भाई ठाकूर टोळीची दहशत समोर आली आणि देशभरात खळबळ उडाली. भाई ठाकूरच्या साम्राज्याला सुरूंग लावणारा म्हणून सुरेश दुबे खून खटला ओळखला जातो.

१९९०च्या दशकामध्ये वसई-विरार परिसरात भाई ठाकूर टोळीचा दबदबा होता. कोणाच्याही जागेवर अतिक्रमण करून जागा ताब्यात घेतल्या जात होत्या. याच काळात नालासोपारामध्ये दुबे कुटुंबीय स्थिरावले होते. दुबे कुटुंबातील मालकीची एक जागा ठाकूर टोळीने मागितली होती. त्याला सुरेश दुबे याने नकार दिला होता. खरे तर प्रकरण येथेच थांबले होते; परंतु एका बिल्डरने नकार दिला तर आपली नाचक्की होईल व दबदबा कमी होईल, अशी भीती भाई ठाकूर यांना वाटली होती.  त्यामुळे भाई ठाकूर यांनी सुरेश दुबेला एकदा आपल्या कार्यालयात बोलावून दमदाटी केली व जागा सोडली नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती मिळत आहे.

या धमकीमुळे दुबे कुटुंबीय घाबरले. त्यांनी सुरेश दुबेला गावी जाण्यासाठी सांगितले. त्यामुळे सुरेश दुबे ९ ऑक्टोबरला गावी जाण्यासाठी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नालासोपारा रेल्वेस्थानकावर आला. गाडी येण्यास उशीर असल्यामुळे दुबे एक इंग्रजी पेपर वाचत बसला होते. दुसरीकडे आपली दहशत कायम ठेवण्यासाठी सुरेश दुबेला जाहीररीत्या मारण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. त्यामुळे फलाट क्रमांक दोनवर सुरेश दुबेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी १९९२ साली यातील आरोपींना टाडा लावण्यात आला होता. त्यानंतर १७ आरोपींना अटक करण्यात आली होती.

राज्यभरात उडाली खळबळ
  दुबे आणि त्याच्या कुटुंबीयांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. 
  १९८९ मध्ये याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. 
  मात्र, १९९२ मध्ये याप्रकरणी  गुन्हा दाखल करून घेतला गेला. 
  वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे नाव या खून प्रकरणी घेण्यात आल्याने, संपूर्ण राज्यात खळबळ माजली. 
  आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावरील कथित आरोपांमुळे हा खटला हाय प्रोफाइल म्हणून देशभरात गाजला होता.

Web Title: Suraj Dubey murder case that undermined Bhai Thakur's empire, what exactly happened, shook the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.