वृक्षारोपणासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ

By Admin | Published: July 3, 2017 05:48 AM2017-07-03T05:48:18+5:302017-07-03T05:48:18+5:30

तालुक्यातील जागतीक वृक्षारोपन दिवस विविध शासकिय कार्यालये, शाळांकरीता मोठ्या संख्येने वन विभागाने सुरू केलेल्या रोपे

Surplus workers for tree plantation | वृक्षारोपणासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ

वृक्षारोपणासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार - तालुक्यातील जागतीक वृक्षारोपन दिवस विविध शासकिय कार्यालये, शाळांकरीता मोठ्या संख्येने वन विभागाने सुरू केलेल्या रोपे वाटप केंद्रात गर्दी करून वृक्षारोपन दिन साजरा करण्यात आला. आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ३० आश्रमशाळांकरीता लेखाधिकारी ठाकरे यांनी स्वत: केंद्रातून रोपे खरेदी करून शासकिय आश्रमशाळा येथे लावले आहेत. त्यांच्या सोबत कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी अवचर, न्यु.ब. कर्मचारी गणेश कांबळे, रोखपाल जे. आर. पाटील, शिक्षण विभागाचे तावडे आदि कर्मचारी उपस्थित होते.
तसेच एस.टी. महामंडळानेही वनमित्र पारस सहाने यांच्या सहकाऱ्यांने विविध प्रकारची रोपे खरेदी करून एस. टी. डेपो व बस स्टॅन्डच्या आवारात लावण्या आले. तसेच येथील शासकिय शाळांतील विद्यार्थ्यांनीही घरी नेऊन लावण्याकरीता रोपे खरेदी केले अशा विविध शासकिय कार्यालयातील व शाळांतील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने रोपे खरेदी करून मोठ्याप्रमाणात रोपे लावण्यात आलेले आहे.

Web Title: Surplus workers for tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.