सूर्या धरणाला धोका?, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 05:16 AM2017-12-27T05:16:27+5:302017-12-27T05:16:35+5:30
विक्रमगड (पालघर) : जव्हार तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असताना सोमवारी रात्री विक्रमगड तालुक्यातील खुडेद अंतर्गत महालेपाडा, ठाकूरपाडा या व साखरे अंतर्गत १२ पाड्यांतही भूकंपाचे धक्के जाणवले.
राहुल वाडेकर
विक्रमगड (पालघर) : जव्हार तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असताना सोमवारी रात्री विक्रमगड तालुक्यातील खुडेद अंतर्गत महालेपाडा, ठाकूरपाडा या व साखरे अंतर्गत १२ पाड्यांतही भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्याची तीव्रता गेल्या तीन दिवसांपासून वाढली असून घरांना तडे गेले आहेत. हा प्रकार असाच कायम राहिल्यास याच तालुक्यात असणाºया मुंबई, भार्इंदर, वसई-विरार यांना पाणीपुरवठा करणाºया सूर्या धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता गावकºयांनी व्यक्त केली आहे. पण तालुक्यात भूकंप मापक यंत्र नसल्यामुळे त्याची तीव्रता कळू शकली नाही.
गेल्या आठवड्यापासून खुडेद अंतर्गत गावपाड्यांत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मापक यंत्रणा उपलब्ध नसल्याने येथील नागरिक भयभीत झाले असून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काही घरांनाही तडे गेले आहेत, असे खुडेदमधील ग्रामस्थ शांताराम पांडू धूम यांनी
सांगितले. सूर्या धरणालगत असणाºया गावपाड्यांना धक्के बसत असल्याने लोक रात्री घराबाहेर झोपत आहेत.
>साखरे ग्रामपंचायत आणि खुडेद ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गावपाड्यांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याबाबत आम्ही पाहणी केली असता कुठलीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नसून याबाबत आम्ही वरिष्ठांना कळविले आहे.
- एस. सी. कामडी, निवासी तहसीलदार, विक्र मगड