केळठण येथील भातशेतीच्या नुकसानीची डावखरेंकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:08 AM2018-08-20T03:08:56+5:302018-08-20T03:10:28+5:30
शेतकऱ्यांना न्याय देण्याचे दिले आश्वासन
वाडा : तालुक्यातील केळठण येथील वेनस बायोक्यूटिकल या कंपनीच्या सांडपाण्यामुळे गोराड येथील २७ शेतकºयांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. तर पिण्याचे पाणी प्रदुषित झाले असल्याची माहिती मिळताच आमदार निरंजन डावखरे यांनी गुरूवारी गोराड गावाला भेट देऊन भातशेतीची पाहणी करत वस्तुस्थिती जाणून घेतली.
केळठण ग्रामपंचायतीच्या हद्दीत वेनस बायोक्यूटिकल ही कंपनी आहे. या कंपनीत सौंदर्य प्रसाधनाचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीतील सांडपाणी कंपनीने बाहेर सोडून दिल्याने शेतकºयांच्या भातशेतीत गेले. शेतात रासायनिक तवंग गेल्याने कित्येक एकर भातशेती धोक्यात आली आहे. सांडपाण्यामुळे दुर्गधी पसरली असून डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. शिवाय गावाला एकमेव पाणी पुरवठा करणाºया विहिरीतील पाण्यातही प्रदुषित सांडपाणी झिरपल्याने पाणीही दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या बाबतची माहिती आमदार निरंजन डावखरे यांना मिळताच त्यांनी गुरूवारी गोराड गावाला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी संपूर्ण भातशेती जवळून पाहिली. दुषित झालेल्या विहीरीचे पाणीही प्रत्यक्षात पाहून त्याचे नमुने त्यांनीही घेतले. त्यानंतर उपस्थित असलेल्या ग्रामस्थ व कर्मचाºयांकडून त्यांनी अधिक माहिती जाणून घेतली.
आदिवासी शेतकºयांच्या झालेल्या भातशेतीच्या नुकसानीबाबत पालघरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती दाखवून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश कंपनीला देण्यात येईल अशी माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली.