जिल्हा परिषद शाळेत अवतरली सूर्यमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:47 PM2019-07-23T22:47:05+5:302019-07-23T22:48:00+5:30
अत्यंत रंजक अनुभव : चला घेऊया प्रत्यक्ष अनुभूती आपल्या तळहातावर
तलासरी : मर्ज क्यूब अॅप द्वारे संपुर्ण सूर्यमालेची एक सुंदर, अकल्पित व रंजक अध्ययन अनुभूती गिरगाव ब्राम्हणपाडा शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. सध्या मर्ज क्यूब या अॅपच्या वापराबाबत सर्वामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अनेक शाळेत या अॅपद्वारे मुलांना सूर्यमालेची व्हर्च्युअल (आभासी) अनुभूती दिली गेली आहे. ३ डी इफेक्टसह दिसणारे हे दृश्य प्रत्येक विद्यार्थ्यांत खगोलशास्त्राचे कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणारे ठरले. त्याला विद्यार्थ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला.
इयता ५ वी विषय परिसर अभ्यास-१
घटक : आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला हा घटक विद्यार्थ्यांना शिकवताना खूप चांगली मदत शिक्षकांना झाली आहे, यामुळे मुलांना प्रत्यक्ष सूर्यमाला पाहता आली. आणि मुलांमध्ये आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला याबाबत अधिकच आनंद निर्माण झाल्यामुळे त्यांना अगदी जवळून आपल्या तळहातात सूर्यमाला पाहता आली.