सूर्या प्रादेशिक पाणी योजनेचे काम बंद पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 03:06 AM2018-11-10T03:06:44+5:302018-11-10T03:06:54+5:30
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत सर्व नियम धाब्यावर बसून पुन्हा सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या कामाला हलोली येथे सुरवात केली मात्र तेथील सरपंच ,सदस्य व शेतकऱ्यांनी काम बंद पाडले.
मनोर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत सर्व नियम धाब्यावर बसून पुन्हा सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या कामाला हलोली येथे सुरवात केली मात्र तेथील सरपंच ,सदस्य व शेतकऱ्यांनी काम बंद पाडले.
एम एम आर डी ए व एलएनटी यांनी कोणतीही परवानगी न घेता काम सुरू केले होते. सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस पालघर जिल्हातील ग्रामीण भागातील स्थानिक शेतकºयांचा तीव्र विरोध आहे पावसाळ्या आधी मेंढवण , वाडे खडकोना, चिल्हार , नांदगाव येथे कामाला सुरवात केली होती परंतु त्या वेळी सूर्या पाणी बचाव समितीने जिल्हा बंद बेमुदत उपोषण करून ते काम बंद पाडले ते काम तिथे न करिता चार महिन्या नंतर पुन्हा हलोली बोट हद्दीत सुरू केले स्थानिक शेतकºयांनी आक्षेप घेतले तरी काम सुरू होते शेवटी तेथील सरपंच समृद्धी सांबरे उपसरपंच अजय पाटील, सुवर्णा सातवी, पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील ,धनेश पाटील,दीपक पाटील सह संतप्त शेतकºयांनी काम बंद पाडले. वसई विरार , मीरा भार्इंदर महानगरपालिका व २७ गावांसाठी एम एम आर डी ए ४०३ एम एल डी क्षमतेची सुमारे १३०० कोटी खर्चाची सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा
योजना राबवत आहे आपल्या
हक्काचे, सिंचनाचे पाणी शहरी भागात देण्यात येत आहे ते पाणी जोपर्यंत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना मिळत नाही तोपर्यंत या योजनेचे काम सुरू होऊ देणार नाही असे सूर्या पाणी बचाव समितीचे रमाकांत पाटील यांनी लोकमत ला सांगितले.
परवानगीविना काम सुरू केलेच कसे?
वनविभाग ने त्यांच्या जमिनीत खोदकाम करण्याची कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही तसेच सूर्या प्रकल्पाने ही परवानगी दिलेली नाही तरी सुद्धा एम एम आर डीए व एल अॅन्ड टी च्या ठेकेदाराने कामाला सुरुवात कशी केली असा प्रश्न आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एम एम आर डी ए आणि शेतकरी यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी शेतकºयाचे व ग्रामस्थांचे समाधान होत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये, अशी भूमिका हलोलीच्या सरपंच समृद्धी सांबरे यांनी मांडली आहे.