घरपट्टी प्रकरणात वसई-विरार पालिकेतील लाचखोर लिपिक निलंबित
By admin | Published: April 29, 2017 01:19 AM2017-04-29T01:19:13+5:302017-04-29T01:19:13+5:30
लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्याने वसई विरार महापालिका आयुक्तांनी प्रभाग समिती जी मधील वरिष्ठ लिपिक अनिल
वसई : लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्याने वसई विरार महापालिका आयुक्तांनी प्रभाग समिती जी मधील वरिष्ठ लिपिक अनिल बाबू जाधव याला निलंबित केले आहे. घरपट्टी लावण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी जाधव याच्यावर ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाने नुकताच गुन्हा दाखल केला होता.
वसई पूर्वेच्या वालिव येथील इम्रान लाला या तक्र ारदाला आपल्या साई टॉवर (सर्वे न ४८ हिस्सा न. ९ ) या इमारतीला घरपट्टी लावायची होती. वर्षभरापासून तक्र ारदार प्रभाग समिती कार्यालयात चकरा मारत होते. प्रभाग समिती जी चा वरिष्ठ लिपिक अनिल जाधव यांनी त्यासाठी ९० हजार रु पयांची लाच मागितली होती. त्यामुळे लाला यांनी १ डिसेंबर २०१६ रोजी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्र ार दाखल केली होती. जाधव याचे संभाषण रेकॉर्ड करून ७ एप्रिल रोजी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जाधव हा लाच मागत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधात्मक खाच्याच्या पडताळणीत निष्पन्न झाले होते. त्यामुळे आयुक्तांनी जाधव याला निलंबित केले आहे.