मेमु न थांबवणारा मोटरमन निलंबित,उमरोलीतील प्रकार, प्रवाशांचा संताप अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 02:32 AM2018-01-09T02:32:20+5:302018-01-09T02:32:29+5:30
पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानकातून पहाटे सुटलेली ६९१६४ ही डहाणू - पनवेल मेमु गाडी उमरोली रेल्वे स्थानकात अधिकृत थांबा असताना मोटरमन ने आज (सोमवारी) सकाळी न थांबवता पुढे नेली. ह्या प्रकरणी मोटरमन प्रशांत जेना ह्यांना वसई स्टेशनला उतरवून सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
- हितेन नाईक
पालघर : पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्थानकातून पहाटे सुटलेली ६९१६४ ही डहाणू - पनवेल मेमु गाडी उमरोली रेल्वे स्थानकात अधिकृत थांबा असताना मोटरमन ने आज (सोमवारी) सकाळी न थांबवता पुढे नेली. ह्या प्रकरणी मोटरमन प्रशांत जेना ह्यांना वसई स्टेशनला उतरवून सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
पहाटे ५:३० वाजताच्या दरम्यान डहाणू रेल्वे स्थानकातून सुटलेली पनवेल मेमु ही ५:५५ मिनिटांनी नियमित वेळेनुसार उंमरोळी स्थानकात येणार असल्याने शेकडो विद्यार्थी, चाकरमानी, छोटे व्यावसायिक आदी वाट पहात होते. मात्र ही गाडी न थांबताच पुढे निघून गेली. आणि प्रवाशांचा एकच कल्लोळ सुरू झाला. मेमु गाडीचे गार्ड बिपीन पटेल ह्यांनी घेतलेला इमर्जन्सी ब्रेक आणि त्याचवेळी प्रवाशांनी ही चेन पुलिंग केल्याने सदर गाडी उमरोली स्थानका पासून सुमारे 1 किमी लांब पेट्रोल पंपा जवळ थांबली. आणि काही वेळाने पालघर कडे मार्गस्थ झाली.
मेमु पुढे निघून गेल्याचे समजताच उमरोली गावातून शेकडो ग्रामस्थ स्टेशनवर जमा झाले. ह्यावेळी डहाणू हुन मुंबई कडे जाणारी अंधेरी लोकल प्रवाशां सह स्थानिकांनी काही काळ रोखून धरत आंदोलन केले. उंमरोळी रेल्वे स्थानक प्रशासनाने या बद्दल प्रवाश्याकडे दिलिगरी व्यक्त केल्याने प्रवाश्याना तूर्तास आंदोलन मागे घेतले. ही मेमु गाडी चुकल्याने अनेक चाकरमान्यांना रोजगाराचा तर विद्यार्थ्यांची शाळा चुकल्याचे त्यांना त्याचा फटका बसला आहे.
या घटने नंतर डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी, उपाध्यक्ष महेश पाटील, सहसचिव प्रथमेश प्रभूतेंडोलकर, उमरोली सरपंच पाटील, अनिल तरे आदींनी पालघर रेल्वे स्थानकात जाऊन स्टेशन प्रबंधक सी. एच. कोहली ह्यांची भेट घेत त्यांच्या कडे तक्र ार केली आहे. दरम्यान, प्रवासी सेवा संघटनेने पश्चिम रेल्वेचे डीआरएम मुकुल जैन ह्याच्या कडे सोशल मीडिया वरून तक्र ार केल्यानंतर मेमु गाडी वसई स्टेशनला थांबल्यानंतर मोटरमन प्रशांत जेना ह्यांच्या विरोधात कडक कारवाई करताना त्याच्या कडून गाडीचा ताबा काढून घेत त्यांना निलंबित केल्याचा मेसेज आला. त्याला स्टेशन प्रबंधक कोहली ह्यांनीही दुजोरा दिला आहे.
प्रवाशांची फसवणूक
उमरोळी रेल्वे स्टेशन ची उभारणी २८ मे २००० साली करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने वैतरणा ते डहाणू पर्यंतच्या भागाला उपनगरीय रेल्वेचा दर्जा बहाल केला असून मोठ्या प्रमाणात उपनगरीय कर वसूल केला जात आहे.
रेल्वे अॅक्ट नुसार उमरोळी स्टेशन मधून वर्षाकाठी १२ लाख ५० हजाराचे उत्पन्न आणि महिन्याला ४४ हजाराचा उपनगरीय कर वसूल केला जात असताना ह्या स्टेशन मध्ये रेल्वे प्रशासनाने एकही अधिकृत अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती केलेली नाही.
ह्या स्टेशन मधून सर्व स्टेशनची तिकिटे मिळण्याची व्यवस्था आणि युटीएस सिस्टिम आदी सुविधा उपलब्ध करून दिली जात नाहित. परिणामी इथल्या प्रवाश्यांना ५ ते ६ किमीचे अंतर कापून एकतर बोईसर अथवा पालघर स्टेशन गाठावे लागत आहे.
शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय आदी सोयीसुविधा बाबत तर बोंब असून अनेक तक्र ारी करूनही रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याचे उमरोळीचे अनिल तरे ह्यांनी सांगितले. नियमानुसार ह्या स्टेशन ला ‘सी’ दर्जा बहाल तशा सुविधा दिल्या जात नाही.