ठाण्याच्या ठाकरे गटाच्या माजी जिल्हाप्रमुखांच्या मुलाचा अर्नाळ्यात संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 03:59 PM2024-07-29T15:59:39+5:302024-07-29T16:00:11+5:30

अर्नाळ्याच्या नवापूर येथील सेवेन सी रिसॉटमध्ये ठाण्याचे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Suspicious death of son of Thane Thackeray group's former district chief in Arnala | ठाण्याच्या ठाकरे गटाच्या माजी जिल्हाप्रमुखांच्या मुलाचा अर्नाळ्यात संशयास्पद मृत्यू

ठाण्याच्या ठाकरे गटाच्या माजी जिल्हाप्रमुखांच्या मुलाचा अर्नाळ्यात संशयास्पद मृत्यू

- मंगेश कराळे
नालासोपारा- अर्नाळ्याच्या नवापूर येथील सेवेन सी रिसॉटमध्ये ठाण्याचे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अर्नाळा पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ५ ते ६ आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

ठाण्यात राहणारे मिलिंद मोरे (४७) हे आपल्या कुटुंबासह रविवारी नवापूर येचीतर सेव्हन सी बीच रिसॉर्ट येथे सहलीसाठी आले होते. यावेळी रिसॉर्ट बाहेरच एका रिक्षाचालकाने मोरे यांच्या पुतण्याला धडक दिली. यामुळे मोरे कुटुंबीयांचा त्या रिक्षा चालकासोबत वाद झाला होता. काही वेळातच रिक्षा चालक गावात गेला आणि आपल्या साथीदारांना घेऊन आला. त्यांनी मिलिंद मोरे, त्याचा भाऊ तसेच दोन मित्रांवर हल्ला करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत वर्मी घाव बसल्याने मोरे सर्वांसोबत उभे असताना काही कळण्याच्या आतच खाली कोसळले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान हाणामारी आणि मिलिंद कोसळल्याची घटना रिसॅार्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

या घटने प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी ७ ते ८ महिला आणि ८ ते १० अनोळखी पुरुष यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ५ ते ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अद्याप कुणालाही अटक केलेले नाही. मिलिंद मोरे यांच्या पार्थिवावर सोमवारी ठाण्यातील जवाहर बाग वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे

नेमके काय घडले
घटनेच्या दिवशी रिसॉर्ट समोरील रिक्षा बाजूला करण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादित चक्क ठाण्याच्या या कुटुंबाला १० ते १५ जनांनी बेदम मारहाण केली आहे. यात महिलांना ही मारहाण करण्यात आली आहे. यात मिलिंदचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे, तर दोघे यात गंभीर जखमी झाले आहेत.

अनधिकृत रिसॉर्टवर कारवाईला सुरुवात
अर्नाळा बीचवरील अनधिकृत आणि बेकायदेशीर सुरू असेल्या रिसॅार्टवर आता तोडक कारवाई करण्यासाठी मनपाचे पथक रवाना झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल घेऊन मनपाला अनधिकृत असलेल्या रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

Web Title: Suspicious death of son of Thane Thackeray group's former district chief in Arnala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.