झेंडावंदन करणाऱ्या श्रमजीवींना चोपले

By admin | Published: January 28, 2017 02:31 AM2017-01-28T02:31:09+5:302017-01-28T02:31:09+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच आदिवासी श्रमजीवींना झेंडावंदनाचा हक्क नाकारण्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली. माजी आमदार

The swamping workers chased the workers | झेंडावंदन करणाऱ्या श्रमजीवींना चोपले

झेंडावंदन करणाऱ्या श्रमजीवींना चोपले

Next

वाडा : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच आदिवासी श्रमजीवींना झेंडावंदनाचा हक्क नाकारण्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली. माजी आमदार आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चापूर्वी सभासदांनी जिल्हाधिकारी कार्यालयात फडकलेल्या झेंड्याला वंदन करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न हाणून पाडत नाशिक पोलिसांनी विवेक पंडित यांच्यासह शेकडो आंदोलकांना अटक केली. या वेळी पुरुष पोलिसांनी महिला आंदोलकांना अक्षरश: फरफटत नेऊन अटक केल्याचा आरोप करण्यात आला.
मेजर रामराव लोंढे या माजी सैनिकाच्या न्याय्य हक्कासाठी या मोर्चाचे आयोजन केले होते. १९७१ च्या भारत-पाक युद्धात गोळ्या झेललेले त्र्यंबकेश्वर येथे राहणारे माजी सैनिक मेजर रामराव लोंढे यांचे घर त्र्यंबक नगर परिषदेने जमीनदोस्त केले. मेजर लोंढे यांनी सैन्यातून परतल्यावर सरकारकडून ११ हजार रुपयांना जमीन विकत घेतली होती. या जमिनीत त्यांनी सरकारी परवानगी प्रक्रिया पूर्ण करत घर बांधले होते. त्यानंतर, नगर परिषदेच्या नाहरकत परवानग्या घेऊन त्या ठिकाणी माजी सैनिकांचे कार्यालय सुरू केले. सिंहस्थ कुंभ मेळाव्याचे कारण पुढे करत शाही मार्गावर नसलेले हे बांधकाम राजकीय आकसापोटी प्रशासनाने तोडले. विशेष म्हणजे त्यांच्याशेजारी असलेले नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे अतिक्र मण मात्र पूर्णपणे दुर्लक्षित केले. याबाबत जाब विचारण्यासाठी पंडित यांनी स्वत: नाशिकमध्ये येऊन संघर्ष केला. यानंतर आठ दिवस आधी निवेदन देऊन २६ जानेवारी रोजी आंदोलन करण्याची पूर्वकल्पना प्रशासनाला दिली होती. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विवेक पंडित यांना २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भेटण्याचे कबूल केले होते. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता जेव्हा आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले आणि तेथील राष्ट्रध्वजाला वंदन करण्याचा आपला सांविधानिक हक्क बजावू लागले, तेव्हा येथील पोलिसांनी आंदोलकांना अडवले. (वार्ताहर)

Web Title: The swamping workers chased the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.