अखेर चर्चेतील वसई विरार मनपाचा कनिष्ठ अभियंता स्वरूप खानोलकर पालिका सेवेतून कमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 03:29 PM2021-08-28T15:29:04+5:302021-08-28T15:30:05+5:30

Vasai Virar News : जी प्रभागातील अनधिकृत बांधकामाचा कार्यभार देखील पाहताना या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे थांबवण्यात जाणीवपूर्वक अपयशी ठरलेले खानोलकर आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडण्यास पूर्णपणे असमर्थ.

Swarup Khanolkar, a junior engineer of Vasai Virar Corporation, was removed from the service | अखेर चर्चेतील वसई विरार मनपाचा कनिष्ठ अभियंता स्वरूप खानोलकर पालिका सेवेतून कमी 

अखेर चर्चेतील वसई विरार मनपाचा कनिष्ठ अभियंता स्वरूप खानोलकर पालिका सेवेतून कमी 

googlenewsNext

आशिष राणे

वसई - 'एफ' प्रभाग समितीत ठेका पद्धतीवर कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता युवराज पाटील यांस पालिका सेवेतून कमी केल्यानंतर आता पुन्हा चर्चेतील कनिष्ठ अभियंता ( ठेका) स्वरूप खानोलकर यांस ही पालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी घरचा रस्ता दाखवला आहे दरम्यान दि.25 ऑगस्ट 2021 रोजी कार्यालयीन आदेश काढून आयुक्तांनी खानोलकर यांस पालिका सेवेतून कमी केल्याचा लेखी आदेशच काढल्याने सर्वत्र पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे.

महापालिका आयुक्तांनी या आदेशात म्हंटलं आहे की, वालीव प्रभाग समिती 'जी' येथे उद्यान विभागात खानोलकर यांची बदली करण्यात आली होती त्यानंतर अतिरिक्त आयुक्त यांचे अधिनस्त कर आकारणी व संकलन या विभागात बदली करण्यात आली मात्र दोन्ही ठिकाणी ही त्याचे काम असमाधानकारक असल्याचे दिसून आले 

दरम्यान जी प्रभागातील अनधिकृत बांधकामाचा कार्यभार देखील पाहताना या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे थांबवण्यात जाणीवपूर्वक अपयशी ठरलेले खानोलकर आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडण्यास पूर्णपणे असमर्थ ठरल्यावर देखील शेवटी पुन्हा एसटीपी ( मलनिस्सारण ) बोलींज प्रभागात ही कामात दुर्लक्ष व सर्वं सेवांमध्ये कर्तव्यात कसूर केल्याने अखेर 25 ऑगस्ट 2021रोजीच्या कार्यालयीन आदेशानुसार आयुक्तांनी स्वरुप खानोलकर यांस महापालिका सेवेतून कमी करत घरचा रस्ता दाखवला. 
 

Web Title: Swarup Khanolkar, a junior engineer of Vasai Virar Corporation, was removed from the service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.