जाचक निर्बंधांनी ताडी व्यवसाय बंद?

By Admin | Published: December 31, 2016 03:53 AM2016-12-31T03:53:45+5:302016-12-31T03:53:45+5:30

तालुक्यातील ९४ गाव-पाडयात सप्टेंबर ते जुलै या हंगामामध्ये सद्या उत्तम थंडी पडल्याने प्रत्येक झाडातून सात ते आठ लिटर ताडी मिळत असल्याने व तिला २५ रुपये लिटरचाभाव

Taddi business closed? | जाचक निर्बंधांनी ताडी व्यवसाय बंद?

जाचक निर्बंधांनी ताडी व्यवसाय बंद?

googlenewsNext

- राहुल वाडेकर,  विक्रमगड
तालुक्यातील ९४ गाव-पाडयात सप्टेंबर ते जुलै या हंगामामध्ये सद्या उत्तम थंडी पडल्याने प्रत्येक झाडातून सात ते आठ लिटर ताडी मिळत असल्याने व तिला २५ रुपये लिटरचाभाव मिळत असल्याने भूमीपुत्रांना रोजगार लाभतो आहे. परंतु शासनाच्या जाचक निर्बंधामुळे तो धोक्यात सापडला आहे. दरवर्षी ताड व खजूराच्या झाडांपासून निघणारा नैसर्गिक रस म्हणजेच ताडी विक्री व्यवसाय केला जातो़ यातून येथील खेडया-पाडयातील तरुणांना रोजगार उपलब्ध होत असतो़ सध्या थंडीच्या मोसमामध्ये ताडीचा उतरा चांगला येत असल्याने रोज एका ताडाच्या झाडास जवळ जवळ सात ते आठ लिटर ताडी गळते.एक लिटर करीता २५ रुपये असा भाव आहे़ दरम्यान शासनाने या व्यवसायासाठी जाचक अटी व नियम लादल्याने या व्यवसायावर मर्यादा पडल्या आहेत़
त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील बेकार तरुणांना जर का नविन टी़ डी़ आर प्रमाणे ताडी विक्री परवाना देण्याचे धोरण उत्पादन शुल्क खात्याने व महाराष्ट्र शासनाने ठरविले तर काही बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे़ त्यामुळे याभागातील बेकारी दूर होण्यास मदतच होणार आहे़
जिल्हयांच्या ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर ताडी विक्री होत असते़ दारु व इतर विदेशी मदय, गावठी दारु यांपेक्षा ताडी पिण्यास पाण्याप्रमाणे व चवीस गोडी असलेली ताडी शरीरास थंडावा देते, तर माफक प्रमाणात ताडी सेवन केल्यास नैसर्गिक गुणधर्म असल्यसाने शरीरास उपाय कारक ठरत असते़
ताडीमुळे पोटांचे विकार दूर होतात तर मुतखडा पडण्यास मदत होते जरी या पेयामुळे नशा येत असली तरी ताडीमध्ये अनेक गुणधर्म आहे़ मात्र तिचे पिण्याचे प्रमाण मर्यादीत असले पाहीजे़

शासनाने ताडी विक्री व्यवसायाकारीता ठेवलेल्या जाचक अटी शिथील कराव्यात व सर्व ताडी विक्रेत्यांना कायदेशिररित्या परवाने दयावे याकरीता असलेली शासनाची फी भरण्यास आम्ही तयार आहोत़ त्यातून शासनास महसूल मिळेल व आम्हांस रोजगार उपलब्ध होईल़ यावर अनेकांचे पोट भरले जाते़. हे सरकारने विसरू नये.
- नावजी तुंबडा, भंडारी आंबेघर गांव

Web Title: Taddi business closed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.