दगडखाणी, घरांची पालघर तहसीलदारांनी केली पाहणी; कारवाई कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:36 AM2020-02-07T00:36:31+5:302020-02-07T00:36:56+5:30

ग्रामसभेत ठराव करून उलटले वर्ष

Tahsildar inspection of stone pellets, houses; When to take action? | दगडखाणी, घरांची पालघर तहसीलदारांनी केली पाहणी; कारवाई कधी?

दगडखाणी, घरांची पालघर तहसीलदारांनी केली पाहणी; कारवाई कधी?

Next

मनोर : पालघर तालुक्यातील पूर्व भागात ग्रामपंचायत लालोंढे परिसरात येणाऱ्या गवळी पाडा येथील दगडखाणी बंद करण्याच्या ग्रामसभा ठरावाला वर्ष उलटले, तरी काहीही कारवाई झाली नाही. यासंबंधातील वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच महसूल विभागाने तातडीने कार्यवाही केली. येथील दगडखाणी आणि घरांची तहसीलदारांनी पाहणी केली.

लालोंढे ग्रामपंचायत हद्दीत गवळीपाडा जवळील रमेश नंदगवळी यांच्या मालकीच्या जमिनीत दगड खाणीत स्फोट घडवले जातात. यामुळे परिसरामध्ये हादरे बसतात. तसेच तेथील घरांना तडेही गेले आहेत. काही घरांच्या पत्र्यांवर दगड पडल्याची, बोरवेलचे पाणी गायब झाल्याची तक्रारही अनेक ग्रामस्थांनी केली होती.

ग्रामस्थांना त्रास होत असल्याने १३ एप्रिल २०१८ च्या ग्रामसभेत यावर कारवाईचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने शून्य कारवाईची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. तहसीलदार सुनील शिंदे, बोईसर मंडलाधिकारी मनीष वर्तक, तलाठी एस. चुरी आणि इतर महसूल कर्मचाºयांनी लालोंढे गवळी पाडा येथे जाऊन घरांची तसेच दगडखाणींची पाहणी केली.

यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तहसीलदार सुनील शिंदे यांना संपर्क होऊ शकला नाही. मंडलाधिकारी मनीष वर्तक यांना फोन केला असता, आम्ही खाणीवर जाऊन आलो असून तेथील घरांची पहाणी केली आहे. या अनुषंगाने तहसीलदारांनी ग्रामपंचयतीचा ठराव घेऊन ग्रामसेवकाला बोलावल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Tahsildar inspection of stone pellets, houses; When to take action?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.