दलालांविरूध्द तहसीलदार सागर सरसावले

By admin | Published: June 20, 2017 06:35 AM2017-06-20T06:35:03+5:302017-06-20T06:35:03+5:30

पालघरच्या सेतू कार्यालयातून मिळणाऱ्या विविध दाखल्याच्या अर्जासोबत शपथपत्र जोडण्याचा आग्रह करून त्याद्वारे नागरिकांची लाखो रुपयांची लूट

The tahsildar sagar sarsavel against the broker | दलालांविरूध्द तहसीलदार सागर सरसावले

दलालांविरूध्द तहसीलदार सागर सरसावले

Next

हितेन नाईक।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : पालघरच्या सेतू कार्यालयातून मिळणाऱ्या विविध दाखल्याच्या अर्जासोबत शपथपत्र जोडण्याचा आग्रह करून त्याद्वारे नागरिकांची लाखो रुपयांची लूट करणाऱ्या काही दलालांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी पालघरचे तहसीलदार महेश सागर यांनी दाखल्यांसाठी शपथपत्राची सक्ती करणाऱ्या विरोधात तहसील कार्यालयात तक्र ार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
१० वी १२ वी च्या निकाल जाहीर झाल्यानंतर शैक्षणिक प्रवेश,विविध परीक्षा ई. साठी विविध दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची धावपळ सुरू असून तालुक्यातील सर्व सेतू कार्यालये,महा ई सेवा केंद्राच्या समोर मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. दाखल्या साठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तालुका तहसील कार्यालयात आलेल्या ग्रामीण भागातील पालकांना दाखल्या सोबत १०० रुपयाचा स्टॅम्प पेपर घेण्याचा आग्रह करून त्यावर मजकूर लिहिण्याचा वेगळा चार्ज लावून लूट करण्याचा प्रकार तहसील कार्यालयाच्या आसपास असणाऱ्या काही दलालांकडून होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. प्रांताधिकारी विकास गजरे आणि तहसीलदार महेश सागर यांनी आपली स्वत:ची ओळख लपवून सेतू कार्यालयासमोर उभ्या असलेल्या पालका मधील चर्चेचा मागोवा घेतला असता त्यांच्या आपापसातील चर्चेअंती ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली. राज्य आणि केंद्र शासनाने सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था ई. शासकीय संस्था मध्ये शपथपत्रा ऐवजी स्वंय घोषणापत्रे व प्रमाणपत्रे, कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती ऐवजी स्वंय साक्षांकित प्रती स्वीकृत करण्याचे आदेश दिले असतांनाही ग्रामीण भागातील गरीब, अशिक्षित लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही स्टॅम्प व्हेंडर अर्जासोबत स्टॅम्प पेपर घेण्या बाबत करीत असलेला आग्रह आणि त्यातून होणारी लूट थांबविण्याचा दृष्टीने माहितीदर्शक फलक त्यांनी तात्काळ सर्वत्र लावले. शपथपत्र जोडण्याबाबत कुणी सक्ती करीत असल्यास तहसीलच्या ०२५२५-२५४९३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या प्रयत्नाबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त होते आहे.

Web Title: The tahsildar sagar sarsavel against the broker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.