‘टीडीसी विरोधातील लढ्यासाठी सज्ज व्हा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:17 AM2017-07-31T00:17:20+5:302017-07-31T00:17:20+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा भ्रष्ट कारभार जनते समोर आणून त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायला करा, या व इतर विविध मागण्यांच्या लढ्याचे रणशिंग कोकण विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे

taidaisai-vairaodhaataila-ladhayaasaathai-sajaja-vahaa | ‘टीडीसी विरोधातील लढ्यासाठी सज्ज व्हा’

‘टीडीसी विरोधातील लढ्यासाठी सज्ज व्हा’

Next

वाडा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा भ्रष्ट कारभार जनते समोर आणून त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायला करा, या व इतर विविध मागण्यांच्या लढ्याचे रणशिंग कोकण विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी फुंकले असून या लढ्यासाठी तरु णांनी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी वाडा येथे केले.
कोकण विकास मंचच्या वतीने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँके मधील भ्रष्टाचारा विरोधात ४ आॅगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भातील बैठकीचे आयोजन तालुक्यातील गांध्रे येथील कुणबी समाजगृहाच्या सभागृहात करण्यात आले होते. 
ते पुढे म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती बँक ही सर्व सामान्य शेतकºयांची बॅँक आहे. मात्र, या बॅँकेत आता सर्वसामान्य शेतकºयांना स्थान राहिले नसून मूठभर राजकारण्यांनी बॅँकेला विळखा घातला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला असून संचालकांच्या आप्तस्वकियांचेच हितसंबंध राखले जात आहेत. 
या बैठकीला कोकण विकास मंचचे अध्यक्ष नरेश आकरे, सचिव केदार चव्हाण, भगवान सांबरे, महेंद्र ठाकरे, डॉ. गिरीश चौधरी, अशोक गव्हाळे, शशिकांत पाटील, राजेश चौधरी, सुभाष ठाकरे आदी उपस्थित होते. 

Web Title: taidaisai-vairaodhaataila-ladhayaasaathai-sajaja-vahaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.