कारवाई करा! अन्यथा हायवे अ‍ॅथॉरिटीवरच कारवाई करु !, जिल्हाधिका-यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:15 AM2018-01-19T00:15:39+5:302018-01-19T00:15:39+5:30

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तलासरी येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या टप-या १५ दिवसांत हटवा, असा आदेश देऊन तो अमलात न आणल्यास नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीवरच कारवाई करू

Take action! Otherwise, take action against the Highway Authority, the Collector's order | कारवाई करा! अन्यथा हायवे अ‍ॅथॉरिटीवरच कारवाई करु !, जिल्हाधिका-यांचे आदेश

कारवाई करा! अन्यथा हायवे अ‍ॅथॉरिटीवरच कारवाई करु !, जिल्हाधिका-यांचे आदेश

Next

सुरेश काटे
तलासरी : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तलासरी येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या टप-या १५ दिवसांत हटवा, असा आदेश देऊन तो अमलात न आणल्यास नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीवरच कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्याने आता या टपºया हटणार हे निश्चित झाले आहे. हा मुद्दा लोकमतने काही महिन्यांपासून सतत ऐरणीवर आणला होता.
यावेळी एनएचएचे अधिकारी दिनेश अग्रवाल, तहसीलदार विशाल दांैडकर, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सागर साळुंखे व पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते.
उड्डाण पुलाखाली बेकायदा टपºया टाकण्यात येऊन या द्वारे चायनीज, वडापाव, मोबाईलच्या विक्रीसोबत अवैध धंदेही चालत आहेत. चायनीजच्या टपºयांवर धोकादायक पद्धतीने वापरले जाणारे सिलेंडर, काही टपºयांतून मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीती भरून देणे, पान पानाच्या टपरीवर उभे राहून टारगटांनी शाळा, महाविद्यालयात जाणाºया मुलीची छेड काढणे असे प्रकार सुरु आहेत.
या बाबत लोकमतच्या ८ जानेवारीच्या हॅलो पालघर वसईच्या पुरवणीमध्ये ‘ब्रीज खालच्या टपºयांना एनएचएचा आशिर्वाद’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या टपºया काढण्याबाबत आमदार पास्कल धनारे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केले. मात्र, एनएचएचे अधिकारी व पोलीस यंत्रणा त्याची दखल घेत नव्हती. तहसीलकार्यालय व नगरपंचायतीने सुद्धा काखा वर केल्या होत्या. मात्र, लोकमत मधून प्रसिद्ध होणाºया वृत्ताची दखल जिल्हाधिकाºयांनी घेऊन संबंधित यंत्रणेची गुरुवारी बैठक घेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कारवाईमध्ये वेळकाढूपणा व विलंब केल्यास संबधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.
दोन वर्षा पूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी बांगर यांनी टपºया काढण्याचे आदेश दिले होते पण त्याला एनएचएच्या अधिकाºयांनी दुर्लक्षिले होते. त्यामुळे आत्ता या आदेशाची अंमलबजावणी कशी होते या कडे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कलेक्टरांंच्या आदेशानुसार पंधरा दिवसात सर्व टपºया काढण्याची कारवाई करण्यात
येईल,
-दिनेश अग्रवाल, व्यवस्थापक ,
(एन. एच. ए.)

ही कारवाई एनएचएने करावयाची आहे. त्या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात करण्यात येईल.
- विशाल दौडकर, तहसीलदार, तलासरी

Web Title: Take action! Otherwise, take action against the Highway Authority, the Collector's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.