प्लास्टिक अंड्यांवर कारवाई करा, पोलिसांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 01:47 AM2020-01-08T01:47:32+5:302020-01-08T01:47:36+5:30
प्लास्टिक अंडी विकत असल्याचा आरोप करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी म्हणून गावक-यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार अर्ज दिला आहे.
नालासोपारा : पश्चिमेकडील एका गावात गावकऱ्यांना विकण्यासाठी येणारे पाववाले आणि अंडीवाले हे प्लास्टिक अंडी विकत असल्याचा आरोप करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी म्हणून गावक-यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार अर्ज दिला आहे.
प्लास्टिक अंडी विकणाºया एका विक्रेत्याला गावकºयांनी रंगेहात पकडले आणि त्याला त्या अंड्यांसह घेऊन नालासोपारा पोलीस ठाण्यात नेले. प्लास्टिक अंड्यांचे व्हीडिओ काढून गावकºयांनी सोशल मीडियावर टाकून व्हायरल केले आहेत. नालासोपारा पश्चिमेकडील गास गावात रविवारी रात्री अंडी विकण्यासाठी आलेल्या विक्रेत्याला त्याची अंडी फोडून ती प्लास्टिकची असल्याचे उदाहरण दाखवून कुठून आणून विकता याबाबत विचारणा केली. त्याने समेळपाडा येथील ‘लकी एग’ येथून अंडी आणत असून इतर विक्रेतेही त्यांच्याकडूनच खरेदी करत असल्याचे सांगितले. तसेच हे विक्रे ते गास, निर्मळ आजूबाजूच्या गावात अंडी विकत असल्याचे बोलले जात आहे.
यासंबंधीचे व्हीडिओ पाहिल्यावर अनेक तक्रारी दुकान मालकाकडे आल्यावर त्यांनीही बदनामी रोखण्यासाठी नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
>प्लास्टिक अंडी विकणारे लोकांच्या आरोग्याशी खेळत असून या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कडक कारवाई करण्यासाठी नालासोपारा पोलिसांना लेखी तक्रार अर्ज केला आहे. तसेच समेळपाड्यातील लकी एग अंड्याच्या दुकान मालकाला बोलावून त्याचीही चौकशी पोलिसांनी करावी.
- ग्रेगरी फरगोज, तक्र ारदार व गावकरी, गास
याबाबत लेखी तक्रार देण्यात आली असून ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनाला संपर्क साधून योग्य ती कारवाई केली जाणार आहे. - वसंत लब्दे, वरिष्ठ
पोलीस निरीक्षक, नालासोपारा