शिक्षण मातृभाषेतून घ्या, इंग्रजीवर प्रभुत्व हवेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 11:21 PM2019-06-12T23:21:42+5:302019-06-12T23:21:58+5:30

अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन : विद्यावर्धिनीमध्ये ‘करिअर गायडन्स सेमिनार’ लोकमत माध्यम प्रायोजक

Take education from mother tongue, dominance of English! | शिक्षण मातृभाषेतून घ्या, इंग्रजीवर प्रभुत्व हवेच!

शिक्षण मातृभाषेतून घ्या, इंग्रजीवर प्रभुत्व हवेच!

Next

वसई : माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत सुपरपॉवर आहे, असे सांगितले जाते, तरीही इंजिनिअरिंगमध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण मातृभाषेतून घ्यावे, मात्र इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे ही अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ व प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी केले.

दहावी- बारावीच्या विद्यार्थीसाठी त्यांचे पुढील शिक्षण इंजिनिअरिंग क्षेत्रातील असेल तर त्याच्या मार्गदर्शनासाठी विद्यावर्धिनी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, वसई या संस्थेने रविवारी सकाळी वर्तक कॉलेजच्या राजाणी सभागृहात उत्कृष्ट ‘करिअर गायडन्स’ सेमिनारचे आयोजन केले होते. या नि:शुल्क आणि माध्यम प्रायोजक लोकमत असलेल्या सेमिनारसाठी कांदिवली ते पालघरपासून जवळपास तीनशे पालकांनी आपल्या पाल्यांसह नोंदणी करून उपस्थिती लावली.
व्यासपीठावर विद्यावर्धिनीज कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे अध्यक्ष विकास बंधू वर्तक यांच्या समवेत संस्थेचे विश्वस्त बबनशेठ नाईक, भाऊसाहेब मोहोळ, हसमुखभाई शहा, खास पाहुणे म्हणून माहिती तंत्रज्ञान व प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, वसईतील उद्योजक व मार्गदर्शक लायन अशोक ग्रोवर, विद्यावर्धिनी कॉलेजचे प्राचार्य डॉ. हरीश वणकुन्द्रे, प्राचार्य डॉ. पाटीदार, प्राचार्य डॉ. घरूडे तसेच लोकमतचे वसई ब्रँच हेड हरून शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष विकास बंधू वर्तक यांनी सेमिनारचा शुभारंभ करून सर्व उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना पुढील करिअरसाठी शुभेच्छा दिल्या आणि संस्थेची उपयुक्त माहिती विशद केली. (संबंधित वृत्त /पान २ वर)

विविध पैलूंचा उलगडा!
च्कॉलजेच्या प्राध्यापिका मुक्ता साळवी यांनी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगमधील मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल केमिकल तसेच इंटर डिसिप्लिनरी शाखा अशा वेगवेगळ्याा शाखांबद्दलचे अंतर्गत पैलू काय आहेत याची सविस्तर माहिती चित्रफीतीद्वारे दिली.
च्यात प्रामुख्यने बहुतेक उत्पादकांसाठी सर्व शाखांचे एकत्र राहणे कसे आहे हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. प्रत्येकजण वापरत असलेल्या मोबाईलचे त्यांनी उत्कृष्ट उदाहरण दिले. त्यात कम्युनिकेशनचे काम इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स करतात जे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगच्या अंतर्गत येतात, त्याच्या डिझाईनचे काम प्रॉडक्ट डिझाईन इंजिनियर्स कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर्स करतात. ते दोघेही इंटर डिसिप्लिनरी शाखेच्या अंतर्गत येतात.
 

Web Title: Take education from mother tongue, dominance of English!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.