तलासरी पं. समितीवर माकपची सरशी, भाजपला धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 01:16 AM2020-01-09T01:16:50+5:302020-01-09T01:16:59+5:30

तलासरी पंचायत समितीच्या १० जागांपैकी ८ जागा व जिल्हा परिषदेच्या ५ जागांपैकी ४ जागा जिंकून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.

Talasari Pt. CPI (M) surges on BJP | तलासरी पं. समितीवर माकपची सरशी, भाजपला धोबीपछाड

तलासरी पं. समितीवर माकपची सरशी, भाजपला धोबीपछाड

Next

सुरेश काटे 
तलासरी : तलासरी पंचायत समितीच्या १० जागांपैकी ८ जागा व जिल्हा परिषदेच्या ५ जागांपैकी ४ जागा जिंकून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. भाजपला मागील निवडणुकीतील त्यांच्या विजयी जागा राखता न आल्याने मोदीलाट ओसरल्याचे दाखवून दिले. भाजप जि.प.च्या १ गटात, पंचायत समितीच्या २ गणातच विजय मिळवता आला.
तलासरी तालुका हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला आहे. मात्र मागच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने मोदी-लाटेच्या जोरावर तलासरीतील जिल्हा परिषदेच्या पाचपैकी तीन जागा व पंचायत गणाच्या दहापैकी चार जागा जिंकल्या होत्या आणि अपक्षाच्या मदतीने पंचायत समितीचे उपसभापतीपद पटकावले होते. नंतर मात्र अपक्ष संगीता ओझरे या पुन्हा स्वगृही माकपात गेल्याने पंचायत समितीवर माकपचे सभापती व उपसभापती निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डहाणू विधानसभेची आपली गेलेली आमदारकीची जागा परत मिळवल्याने माकप कार्यकर्त्यांत आलेली मरगळ दूर करून कार्यकर्ते जोमाने कामाला लागून त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर निर्विवाद बहुमत मिळविले. दरम्यान, या निवडणुकीत भाजपला अंतर्गत बंडाळी, असंतोष आणि जिल्हा अध्यक्षाबाबत असलेली नाराजी याचा फटका बसला. या उलट माकप तळागाळात जाऊन मतदाराना भेटली. या निवडणुकीत माकप विरुद्ध भाजप अशीच लढत होती. माकप व भाजपबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना, बहुजन विकास आघाडी हेही पक्ष निवडणुकीत ताकदीने उतरले होते, परंतु त्यांना साधे खातेही उघडता आले नाही. मंगळवारी मतदान होऊन बुधवारी सकाळी तलासरी तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. या वेळी तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
। या वेळी तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. माकपचे कार्यकर्ते बहुमताने निवडून येऊ लागले तसतशी तहसील बाहेर गर्दी वाढू लागली. मतमोजणीवेळी तलासरी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. परिस्थितीवर डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी व पोलीस निरीक्षक अजय वसावे लक्ष ठेवून होते.
>तलासरी जिल्हा परिषद गटात विजयी झालेले उमेदवार
१) अनिल रमण झरिवा- मते ५२६४, माकप, उपलात गट
२) शेलू जितेश कुºहाडा- मते ४१७२, पक्ष भाजप, सुत्रकार गट
३) विजय नवश्या उराडे- मते ४८०५, पक्ष माकप, डोंगारी गट
४) रामू भादल पागी- मते ४९४०, पक्ष माकप, झाई गट
५) अक्षय प्रवीण दवणेकर- मते ६०८६, पक्ष माकप, उधवा गट
>तलासरी पंचायत गणात विजयी उमेदवार
१) राजेश दिवाळ खरपडे, मते २३२२, माकप, उपलात गण
२) संतोष पासकल खटाळे, मते २५२९, माकप, कोचाई गण
३) शरद चैत्या उंबरसडा, मते १७६६ माकप, सूत्रकार गण
४) पूजा विजय खरपडे, मते २१७४, भाजप, झरी गण
५) नम्रता मिटेश धोडी, मते ३३११ माकप, डोंगारी गण
६) जयवंती लक्ष्मण घोरखाना, मते ३५१७ भाजप, गिरगाव गण
७) सुनीता जयेश शिंगडा, मते २०९९, माकप, झाई गण
८) भरत रामू कडू, मते २८४२, माकप, वसा गण
९) संगीता माधव ओझरे, मते २५१७ माकप, वडवली गण
१०) नंदकुमार वनश्या हडळ, मते १९४५, माकप उधवा गण

Web Title: Talasari Pt. CPI (M) surges on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.