दोन पाड्यात टँकरने पाणीपुरवठा; ग्रामस्थांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:29 AM2020-02-05T00:29:28+5:302020-02-05T00:30:38+5:30

पाण्यासाठी करावी लागत होती वणवण

Tanker water supply in two piers; Comfort for the villagers | दोन पाड्यात टँकरने पाणीपुरवठा; ग्रामस्थांना दिलासा

दोन पाड्यात टँकरने पाणीपुरवठा; ग्रामस्थांना दिलासा

Next

भातसानगर : शहापूर तालुक्यातील कोळीपाडा व वरचा गायदरा या दोन पाड्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरु वात केली असून नागरिकांनी ‘लोकमत’चे कौतुक केले आहे.

तालुक्यात मागीलवर्षी कमी पाऊस झाल्याने व पाऊसही लवकरच गेल्याने मोठ्या प्रमाणात गावपाडयात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. या वर्षी मात्र खूपच पाऊस पडला. यामुळे यावर्षी उशिरा पाणीटंचाई निर्माण होईल असे वाटत असतानाच अजनूप, दापूर परिसरातील कोळीपाडा व वरचा गायदरा या दोन पाड्यात टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच ग्रामपंचायती मार्फत पाठविण्यात आलेला प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडून थेट जिल्ह्याधिकारी यांनी मागवून तात्काळ टँकर मंजूर करून पाणीपुरवठा सुरू केला आहे.

कोळीपाडा व वारलीपाडा येथील ग्रामस्थ एकाच विहिरीवर पाणी भरतात. या विहिरीत पाणी नसल्याने त्यांना पाण्यासाठी दिवसरात्र वणवण भटकावे लागत होते. कोळीपाड्याची लोकसंख्या आज अडीचशेच्या आसपास असून वारली पाड्याची लोकांख्याही शंभरच्या जवळपास आहे. या पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे केली होती. मात्र त्यास गती देण्याचे काम ‘लोकमत’ने केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरवर्षी येथे टंचाई होते. टँकरने पाणीपुरवठाही केला जातो. मात्र इतक्या वेगाने कार्यवाही ही केवळ ‘लोकमत’च्या वृत्तामुळे अशी प्रतिक्रि या ग्रा.पं. सदस्य प्रदीप चव्हाण यांनी दिली.

Web Title: Tanker water supply in two piers; Comfort for the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.