तलाठ्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 02:58 AM2017-08-18T02:58:35+5:302017-08-18T02:58:35+5:30

तलासरी येथील तहसीलदारानी तलाठ्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ विक्रमगड महसूल कार्यालयातील तलाठ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले.

The Tantric Workshops | तलाठ्यांचे कामबंद आंदोलन

तलाठ्यांचे कामबंद आंदोलन

Next

विक्रमगड : तलासरी येथील तहसीलदारानी तलाठ्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ विक्रमगड महसूल कार्यालयातील तलाठ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले. सलग सुट्ट्या आल्याने आधीच शासकीय कामे बंद होती त्यातच कामाच्या दिवशी तलाठ्याने काम बंद केल्याने आदिवासी बांधवाना मोठा त्रास सहन करावा लागला.
तलासरी येथील तहसिलदार विशाल दौडकर यांनी झरी, वडवली येथील तलाठी सचिन गोळे यांना कार्यालयात उशिरा आल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यावरून आर. डी. पितळे, व्ही.के.जाधव यांच्यासह सर्व तलाठीनी काम बंद केले होते.

Web Title: The Tantric Workshops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.