जीवावर उदार होऊन जवानांनी विझविली तारापूरची आग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 03:12 AM2018-03-14T03:12:58+5:302018-03-14T03:12:58+5:30
अग्निशमन दलाच्या तत्परते मुळेच तारापूर एम आय डी सी मधील स्फोट व आगी नंतर निर्माण झालेला धोका टळला असलातरी त्यात पोलिसांनीही महत्वाची भूमिका बजावली होती
- पंकज राऊत
बोईसर : अग्निशमन दलाच्या तत्परते मुळेच तारापूर एम आय डी सी मधील स्फोट व आगी नंतर निर्माण झालेला धोका टळला असलातरी त्यात पोलिसांनीही महत्वाची भूमिका बजावली होती
आग लागलेल्या व आगीमध्ये भक्षस्थानी पडलेल्या शेजारच्या पाच कारखान्या मधील मार्जिन स्पेसमध्ये पक्का व कच्चा माल यंत्र सामग्री ठेवल्याने तसेच अनिधकृत शेड उभारल्याने आग विझविण्यासाठी अग्नीशमनदलाला जागाच नव्हती त्यामुळे जीव धोक्यात घालून त्यांना ती विझवावी लागली.
भीषण आगीमुळे कारखान्याच्या इमारतीचा भाग व यंत्रसामग्री कुठल्या दिशेने कोसळेल याचा अंदाजआगीच्या लोळा मुळे येत नव्हता त्यामुळे जीवावर उदार होऊनच अग्निशमन दलाच्या जवानांची आगीशी पहाटेपर्यंतची अथक झुंज सुरूच होती.
आग नियंत्रणात आणल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांची खरी कसोटी होती. आत कुणी जिवंत असल्यास त्याची मुक्तता करण्याची त्या दृष्टीने कारवाईची चके्र फिरू लागली आतील तापमान प्रचंड होते तर आग व स्फोटा मुळे कमकुवत झालेल्या इमारतीमध्ये शिरणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण होते परंतु तो ही धोका पत्करून अग्निशमन दलाचे जवान जेवढे शक्य होईल तेवढे आत शिरून शोध घेत होते.
कारण स्फोट झालेल्या कारखान्यात किती कामगार कामावर होते व स्फोटा ची चाहूल लागताच किती जण सुखरूप बाहेर पडले किती जखमी झाले याचा ताळमेळ सांगायला कुणीही जबाबदार व्यक्ती समोर आली नव्हती त्या मुळे गोंधळाची परिस्थिती होतीच दरम्यानच्या काळात शेजारच्या आरती ड्रग या कारखान्या मध्ये तीन निष्पाप कामगारांचे मृतदेह आढळले होते. त्या मृतदेहांचा पोलिसांनी पंचनामा करून तारापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदना करीता पाठविले तरी अजून कुणी कामगार जिवंत किंवा मृतावस्थेत आहे का ? याचा कसोशीने शोध घेण्याचा प्रयत्न अग्निशमन जवानांनी सुरूच ठेवला. दुसर्या दिवशी सकाळी ७ वाजता आग आटोक्यात आली तरी संपूर्ण कारखान्यांमध्ये पाणी आणि फोम मारून कुलिंगचे काम सुरू ठेवून शुक्रवारी रात्री ८ वाजता ही कामगिरी संपवली. मात्र यावेळी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक मंजुनाथ शिंगे, उपविभागीय दंडाधिकारी विकास गजरे, तहसीलदार महेश सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी फतेसीह पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांचे सह पोलीस, महसूल, आरोग्य, प्रदूषण नियंत्रण मंडळ इत्यादी विभागाचे सुमारे १०० अधिकारी व कर्मचाºयांनची घटनास्थळी होते उपस्थित पोलीस निरीक्षक बिराजदार यांनी आपल्या कर्मचाºयांना घेऊन घटनास्थळी जाणारे सर्व रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवून बघायनच्या गर्दीवर नियंत्रण आणले रस्ते मोकळे ठेवल्यामुळे अिग्नशमन दलाच्या रिकाम्या होणाºया गाड्या ज्या वेळी पाणी भरण्यासाठी इतरत्र जात होत्या त्यांना अडचण झाली नाही पोलिसांनी जखमी ना हॉस्पिटलमध्ये नेण्यास मदत केली तर पाणी भरून देण्या साठी आय व्ही पी लिमिटेड, मानधना डाइंग, जी एम सिंथेटिक, नुपूर केमिकल , लोविनो कपूर इत्यादी कारखान्यानी मोलाची मदत केली त्या वेळी एम आय डी सीच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व आॅपरेटर ही जातीने हजर होते. सर्व यंत्रणेच्या टीम वर्कमुळेच आगीवर सहा तासात नियंत्रण मिळवता आले.