तारापूर स्फोट : मालक, मॅनेजर, आॅपरेटरला जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 03:25 AM2018-03-14T03:25:11+5:302018-03-14T03:25:11+5:30

तारापूर एमआयडीसीमधील नोव्हाफाईन स्पेशॅलिटीज प्रा.लि. या रासायनिक कारखान्यामध्ये झालेला भीषण स्फोट व त्यातून लागलेल्या आगीत झालेला चार जणांचा मृत्यू व १४ जखमी झाल्याप्रकरणी कारखान्याच्या मालकासह व्यवस्थापक व २ आॅपरेटर विरुद्ध बोईसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना मंगळवारी अटक केली.

Tarapur blast: Bail to owner, manager, operator | तारापूर स्फोट : मालक, मॅनेजर, आॅपरेटरला जामीन

तारापूर स्फोट : मालक, मॅनेजर, आॅपरेटरला जामीन

Next

बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील नोव्हाफाईन स्पेशॅलिटीज प्रा.लि. या रासायनिक कारखान्यामध्ये झालेला भीषण स्फोट व त्यातून लागलेल्या आगीत झालेला चार जणांचा मृत्यू व १४ जखमी झाल्याप्रकरणी कारखान्याच्या मालकासह व्यवस्थापक व २ आॅपरेटर विरुद्ध बोईसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्याची १५ हजाराच्या व्यक्तीगत जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली.
गुरु वारी रात्री ११.२८ च्या सुमारास प्रथम जेव्हा भीषण स्फोट झाला तेव्हा घटनास्थळा पासून सुमारे २५ कि मी अंतरा पर्यंत हादरा बसला होता तर या आगी मध्ये नोव्हाफाईन स्पेशॅलिटीज प्रा.लि. या कारखान्यासह शेजारचे पाच कारखाने आगीच्या भक्षस्थानी पडले होते तर अन्य दहा कारखान्याचे स्फोटांच्या हादºयाने प्रचंड नुकसान झाले आहे
बोईसर पोलिसांनी या प्रकरणी कारखान्याचे मालक सरल शहा (३४) , व्यवस्थापक हेमराज परतने (४९), आॅपरेटर ज्ञानदीप म्हात्रे (३१) व राजू रावते (३०) या चौघांवर निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरणे, यंत्रसामग्री व रासायनिक पदार्थांच्या हाताळणीत हयगय करणे इत्यादी कलमानुसार सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करून मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
>मृतांची संख्या झाली चार
या दुर्घटनेत शेजारच्या आरती ड्रग या रासायनिक कारखान्यातिल जानू अगरिया, पिंटू गौतम व अलोकनाथ अगरिया या कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर प्राची फार्मास्युटीकल मधील गंभीर जखमी झालेल्या वॉचमनचा मृत्यू सोमवारी गुजरातच्या रु ग्णालयात झाला असा एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून अन्य १४ जखमी झाले होते. त्या पैकी काही जणांना उपचारा नंतर पाठविले असले तरी काहींवर वेगवेगळ्या रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Tarapur blast: Bail to owner, manager, operator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.