तारापूर,पामगावात मॉकड्रिल

By admin | Published: December 17, 2015 12:26 AM2015-12-17T00:26:29+5:302015-12-17T00:26:29+5:30

तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोनमध्ये भूकंपामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून किरणोत्सर्ग बाहेर पडल्याचे गृहीत धरून केंद्र परिसर व पाम गावामध्ये आज आॅफ साईट इमर्जन्सी

Tarapur, Pamagawaa Mockradril | तारापूर,पामगावात मॉकड्रिल

तारापूर,पामगावात मॉकड्रिल

Next

बोईसर : तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोनमध्ये भूकंपामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून किरणोत्सर्ग बाहेर पडल्याचे गृहीत धरून केंद्र परिसर व पाम गावामध्ये आज आॅफ साईट इमर्जन्सी एक्झरसाईजची रंगीत तालीम घेण्यात आली तर याबाबत अनभिज्ञ असलेल्या ग्रामस्थांमध्ये काही काळाकरिता घबराट पसरली तरी या तालमी बाबतची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
अशी कल्पना करण्यात आली की विरारच्या पुढे केंद्रबिंदू असलेला तीव्र क्षमतेचा भूकंप येथे झाला असून त्यामुळे महाराष्ट्रातील विद्युत व दळण-वळण यंत्रणा विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे तारपूर रिअ‍ॅक्टर्स बंद पडले आहेत. अशा स्थितीत इमर्जन्सी डिझेल जनरेटर्स आपोआप सुरू होतात. ज्या द्वारे रिअ‍ॅक्टर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक तो विद्युतपुरवठा केला जातो. तद्नंतर डिझेल जनरेटर्स वेगवेगळ्या कारणास्तव बंद पडून अणुभट्टीला जोडणाऱ्या पाइपलाइन भूकंपामुळे फेल्युअर झाल्याने रिअ‍ॅक्टरमधील कुलींग यंत्रणा ठप्प होऊन इंधन थंड करण्याची प्रक्रिया थांबल्याचे गृहीत धरण्यात आले.
या काल्पनीक घटनेमुळे किरणोत्सर्ग बाहेर पडून प्रथम अणुकेंद्रात पसरून तो वाऱ्याच्या दिशेने झपाट्याने पसरून पाम गावापर्यत पोहचत असल्याचे गृहीत धरून सकाळी साडेसात वाजता आपत्कालीन परिस्थितीची घोषणा तारापूरच्या डीएई सेंटर कडून करण्यात आली. त्यानंतर जिल्हाप्रशासन, पोलीस, जिल्हापरिषद, आरोग्य विभाग, वाहतूक व्यवस्थापन, परीवहन महामंडळ, महसूल,नागरी संरक्षण दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यरत होऊन बाधीत पाम गावात दाखल होऊन आॅफ साईट इमर्जन्सी एक्झरसाईजची रंगीत तालीम सुरू झाली.
वेगवेगळ्या टीम बाधीत पाम गावात दाखल झाल्यानंतर नागरीकांना नाकातोंडावर रूमाल बांधण्याची सूचना देऊन घराच्या दरवाजे खिडक्या बंद करून घरातच बसण्याची विनंती करण्यात आली. बाधीत सेक्टर वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन रेडियोधर्मी आयोडीनपासून थायरॉईडला धोका पोहचू नये म्हणून आयोडीनच्या गोळ्याच्या रूपात चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
एक्सरसाईजच्या तिसऱ्या टप्प्यात गावातील ४६ पुरूष व २१ महिला अशा ६७ नागरीकांना किरणोत्सर्गाची किती बाधा झाली आहे ते तपासून दोन एस.टी च्या बसेस मधून सोळा कि. मी. त्रिज्येच्या बाहेर जि.प. शाळा चारोटी येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले तर बाधीत गावातून आलेल्या एस.टी बसही डीकंडामेशन करण्यात आली. ही प्रक्रिया दुपारी साडेबारा वाजता यशस्वीपणे झाल्याचे जाहीर करण्यात आली.
अनेक ग्रामस्थांना हा प्रकार नवा असल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तारापूरचा हा भाग राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्याने या ठिंकाणी सुरक्षेचा उपाय म्हणून अशी मॉकड्रिल घेण्यात येते.

Web Title: Tarapur, Pamagawaa Mockradril

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.