तारापूरच्या ४ उद्योगांवर बंदची करवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 01:28 AM2017-07-26T01:28:17+5:302017-07-26T01:28:22+5:30
बोईसर : तारापूर एम आय डी सी तील चार उद्योगावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई केली असून लवकरच आणखी १० ते १५ उद्योगावर कारवाई होण्याची शक्यता आहे. ८ महिन्यांत ६४ उद्योगांवर करवाई केली असली तरी काही उद्योगावर पुन्हा पुन्हा करवाई करावी लागल्याने तारपूरच्या उद्योजकांवर धाकच राहिलेला नाही.
तारापूर एमआयडीसीतील उद्योगातून व सामुदायिक केंद्रातून (सी ई टी पी ) प्रक्रिया न करताच प्रचंड प्रमाणात रासायनिक प्रदूषित सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात आणि नाल्या मधे अनधिकृतपणे सोडले जाते आहे.
त्यामुळे पर्यावरणाची हानी केली जात असून त्याचे गंभीर परिणाम किनारपट्टी भागातील मच्छीमार व शेतजमीनीवर होत असल्याची याचिका अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पुण्याच्या राष्ट्रीय हरित लावादा कडे दाखल केल्या नंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डिसेंबर २०१६ पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे
त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे व रायगडच्या विशेष पथकाने मागील आठवड्यात अनेक रासायनिक उद्योगातून बाहेर पडणाºया सांडपाण्याचे नमुने पृथ:करणासाठी पाठविले होते त्या पैकी चार उदयोग दोषी आढळले आहेत तर आणखी अनेकांवर लवकरच कारवाई होणार आहे
आता करवाई करण्यात आलेल्या उद्योगांमध्ये सिल्व्हेस्टर टेक्सटाइल, निपुर केमिकल्स, निर्भया रसायन आणि सारेक्स केमिकल्स या उद्योगाचा समावेश आहे.
सारेक्स केमिकल्सवर एप्रिल महिन्यात उत्पादन तात्पुरते बंद ची करवाई कारण्यात आली होती मात्र तरीही या उद्योगाने पर्यवरणाचे नियम पायदळी तुडविल्याने अशा उद्योगांवर कडक करवाई करण्यात यावी अशी मागणी होत असून ११ सप्टेंबर ला राष्ट्रीय हरित लवादाकडे तारापूर संदर्भात सुनावणी असल्याने तिच्या भीतीने ही कारवाई होत असून त्या सुनावणीकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.