व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर रेखाटतात टॅटूचे गोंदण

By admin | Published: February 15, 2017 04:24 AM2017-02-15T04:24:48+5:302017-02-15T04:24:48+5:30

व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर विविध भेट वस्तू, गुलाब पुष्पांना बऱ्यापैकी मागणी होती. सोशल मिडियावरून प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या तरुणाईने

Tattoos tattoos depicting Valentine's Day | व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर रेखाटतात टॅटूचे गोंदण

व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर रेखाटतात टॅटूचे गोंदण

Next

अनिरु द्ध पाटील / डहाणू
व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर विविध भेट वस्तू, गुलाब पुष्पांना बऱ्यापैकी मागणी होती. सोशल मिडियावरून प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या तरुणाईने या वर्षी शरीराच्या विविध भागांवर प्रिय व्यक्तींच्या नावाचे टॅटू काढण्यावर भर दिला. त्यामुळे येथील आर्टिस्टना सुगीचे दिवस आले होते.
‘आता उतावीळ झालो, गुढघ्या बांशिंग बांधीलं, तुझ्या नावाचं इनिशल मी टॅटूनं गोंदल’ या सैराट चित्रपटातील गाण्याची छाप यंदाच्या व्हॅलेंटाईन डे वर दिसून आली. आपल्या प्रिय व्यक्तीला विविध प्रकारातील भेट वस्तू देणाऱ्या तरुणाईने या वेळी शरीरावर टॅटू गोंदवून अनोखी भेट देण्यावर अधिक भर दिला. त्यामध्ये युवतीही मागे नव्हत्या. डहाणूतील एका पंचावन्न वर्षाच्या महिलेने हातावर पतीच्या नावाचं टॅटू काढून त्याला प्रेमाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान या आठवडयात २० ते २५ व्यक्तींनी परमनंट प्रकारातील, तर ६० ते ७० व्यक्तींनी टेंपरवरी स्वरूपाचे टॅटू काढून घेणे पसंत केले. त्या मध्ये हृदयाच्या आकाराच्या चिन्हात व्हॅलेंटाईनचे नाव, हॅप्पी कपल, एंजल, नेम विथ क्र ाऊन, इन्फिनिटी विथ नेम, नेम विथ हार्ट अँड ऐंजल, मिकी माऊस तसेच विविध प्रेम प्रतिकं आणि संदेश आदींचा त्यात समावेश होता. आपल्या प्रिय व्यक्तिला हे सर्वात सुंदर गिफ्ट असल्याची भावना या गोंदवून घेणाऱ्यांची होती. तर पूर्वी प्रेमाच्या आणाभाका घेऊन गोंदवले टॅटू, या वेलेंटाईन डे आधी प्रेमभंग झाल्याने काहींनी प्रेमभंगाचे दु:ख विसरण्यासाठी टॅटू काढल्याची माहिती ड्रीम टॅटू शॉपचे मालक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केलेले टॅटूइस्ट दिलीप पटेल यांनी दिली.

Web Title: Tattoos tattoos depicting Valentine's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.