शिक्षक देशद्रोही? जाधव विरोधात संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:33 PM2019-03-04T23:33:47+5:302019-03-04T23:33:50+5:30
दुबईतील कार्यक्रमात शिक्षकांना देशद्रोही संबोधणाऱ्या प्रा. नामदेवराव जाधव विरोधात राज्यभरातील शिकधकांमध्ये आक्रोश वाढत आहे.
बोर्डी : दुबईतील कार्यक्रमात शिक्षकांना देशद्रोही संबोधणाऱ्या प्रा. नामदेवराव जाधव विरोधात राज्यभरातील शिकधकांमध्ये आक्रोश वाढत आहे. त्या अनुशंगाने डहाणू तालुका शिक्षक सेनेकडून जाधव यांच्या विरोधात पोलिसात मानहानीबाबत तक्र ारी अर्ज दाखल केला.
दुबई येथील एका कार्यक्र मात नामदेवराव जाधव यांनी, मास्तर शिकवत नसून ७० हजार पगार घेतात, त्यांनी ३० वर्षात ०३ मुलं घडवले असतील तर नावे सांगावीत, सगळ्या पोरांचं वाटुळं या मास्तरांनी केलय, हे हमाल-मजुर आहेत, शिक्षकांसारखी देशद्रोही जमात मला तरी सापडत नाही अशी गरळ ओकली होती. शिक्षकांविषयी हे आक्षेपार्ह, अवमानास्पद व खेदजनक शब्दप्रयोग केल्याने शिक्षकवर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्याचा उद्रेक म्हणून आज डहाणू शिक्षक सेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सहाशे प्राथमिक आणि दोनशे माध्यमिक अशा आठशे शिक्षकांच्यावतीने सोमवार, ४ मार्च रोजी डहाणू पोलीस ठाण्यात जाधव यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्याकरिता एकवटले. त्यांनी या बाबत तक्र ारी अर्ज दिला. यावेळी सुमारे सत्तर शिक्षक उपस्थित होते. नामदेवराव जाधवांच्या विरोधात शिक्षकांमध्ये कमालीचा संताप आहे.