ऑनलाइन बदल्यांच्या निषेधार्थ शिक्षक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:33 AM2019-02-23T01:33:59+5:302019-02-23T01:34:24+5:30

जि. प. शिक्षण विभागाला घेराव : माहिती नमुन्यातील त्रुटी व विस्थापितांना फटका

Teachers angry at the protest against online transfers | ऑनलाइन बदल्यांच्या निषेधार्थ शिक्षक नाराज

ऑनलाइन बदल्यांच्या निषेधार्थ शिक्षक नाराज

googlenewsNext

पालघर : शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या आॅनलाइन बदल्या या आमच्यावर अन्यायकारक असल्याच्या निषेधार्थ शेकडो शिक्षकांनी जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाला घेराव घालीत आपला रोष व्यक्त केला. शासनाच्या शिक्षण विभागा कडून शिक्षकांच्या करण्यात आलेल्या आॅनलाइन बदल्या या अन्यायकारक पद्धतीने करण्यात आल्या असून संकेतस्थळामध्ये किंवा लेखी भरण्याच्या माहिती नमुन्यामध्ये खूप त्रुटी असल्याने याचा फटका बसलेले व विस्थापित झालेल्या शेकडो पदवीधर शिक्षकानी या निषेधार्थ आपला मोर्चा जिल्हा परिषदेवर वळवला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरकर, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती निलेश गंधे व शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन या आॅनलाईन प्रक्रि येतील त्रुटी मध्ये सुधारणात्मक बदल करून ते शासनाला कळवण्याची मागणी केली. आॅनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या प्रणाली मध्ये जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील ९ मुख्याध्यापक ५६ पदवीधर शिक्षक २७३ सहशिक्षक असे ३३८ शिक्षक असे एकूण ६७६ लोक विस्थापित होणार आहेत. मुंबई व उपनगरातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद पडल्यामुळे तेथील सुमारे साडेतीनशे शिक्षक हे जिल्ह्यात येणार आहेत. असे असताना ते इथे आल्यास इथे कार्यरत असलेले मुळ शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत. त्याचप्रमाणे जे शिक्षक अतिरिक्त झाले आहेत त्यांनाच उर्विरत शाळेत का घेतले जात नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.
जिल्ह्यातील समाजशास्त्र विषयाचे ५६ पदवीधर शिक्षक असून विस्थापित झालेले आहेत. या आॅनलाईन प्रणालीनुसार एका शिक्षकाला २० शाळा निवडायचे पर्याय देण्यात आला असेल आणि शाळाही फक्त २० उपलब्ध असतील तर ५६ शिक्षकांनी त्याच शाळा कशा निवडायच्या या बाबत कुठलीही माहिती वा पर्याय उपलब्ध नसल्याचा सवाल या पदवीधर शिक्षकांनी शासनाकडे उपस्थित केला आहे.
या त्रुटी लवकरात लवकर दूर करण्याच्या दृष्टीने शासन धोरणा प्रमाणे अनिवार्य रिक्तपदे असलेल्या शाळा बदली पात्र शिक्षकांसाठी खुल्या केल्यास हा प्रश्न सुटू शकतो.

शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारा मुळे ज्ञानार्जनाचे काम सोडून आपल्या अधिकारासाठी झगडण्यातच वेळ जात असून ह्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणकि नुकसानी सोबत आमचे कौटुंबिक स्वास्थ्यही ढासळत आहे. - नीलिमा पाटील, शिक्षिका.

शिक्षकांनी आपल्या रास्त मागण्या मांडल्या आहेत आॅनलाइन प्रणाली मध्ये त्रुटी असल्याचे त्यांचे म्हणणे असल्याने त्या त्रुटी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रशासन व मी पूर्णपणे प्रयत्नशील राहील.
-निलेश गंधे,
उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती

Web Title: Teachers angry at the protest against online transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.